Supriya Sule: "जरा तुम्हाला कोणी त्रास दिला तर मी ढाल बनून उभी राहील", सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 03:53 PM2024-06-07T15:53:04+5:302024-06-07T15:54:11+5:30
आपण सत्तेत असू किंवा विरोधी पक्षात असू निधी, वीज, पाणी या बाबी तुम्हाला कमी पडू देणार नाही
इंदापूर : त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवार दहा उमेदवार देवून आठ खासदार निवडून आणू शकतात तर तालुका पातळीवर आपण काही करु शकत नाही का. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बँकेपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणूका लढवण्याचा मनसुबा खा.सुप्रिया सुळे यांनी जाहीर केला. जिस को जो लढना है लढेंगे.मैदान खुला और खाली है, त्यामुळे सगळ्यांना तिकीटे मिळणार असे खुले आश्वासन देत खा.सुप्रिया सुळे यांनी सर्व आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर इंदापूरकरांचे आभार मानण्यासाठी त्या गुरुवारी (दि.६ ) रात्री इंदापूरात आल्या होत्या. शहा सांस्कृतिक भवनात त्यांनी कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, बेरोजगारी, महागाई, शेतीमालास भाव नाही, प्रचंड भ्रष्टाचार याला थकून लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे. त्यामुळे आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. इंदापूरकरांनी माझ्यासाठी व शरद पवारांसाठी खुप संघर्ष केला व झेलला. अपेक्षेपेक्षा जास्त मते पदरात टाकली. बारामती लोकसभा व इंदापूर विधानसभा मतदार संघातील मतदारांसमोर नतमस्तक होऊन आपण त्यांचे मनःपूर्वक आभार मानत आहोत. कार्यकर्ते, बुथकमिटीतील लोक व मतदार यांच्यामुळे आपण विजयी झालो. पुढील काळात बुथकमिटीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्याशी चर्चा करुनच विकासकामासाठी निधी टाकला जाईल, असे संकेत सुळे यांनी दिले.
आपण सत्तेत असू किंवा विरोधी पक्षात असू निधी, वीज, पाणी या बाबी तुम्हाला कमी पडू देणार नाही. पाणी वीज वैयक्तिक कुणाची नसते. ते देश देत असतो. सरकारे देतात. त्यामुळे निवडणूकीत झालेल्या भाष्यांबाबत चिंता करु नका. कमी मतदान झाले म्हणून वा राजकीय कारणाने कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर ढाल बनून सुप्रिया सुळे तुमच्यासमोर उभी राहिल. कारण गलिच्छ राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
केंद्र सरकारने इथेनॉलचे धोरण चुकवल्यामुळे शेतकऱ्यांचे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या धोरणाबाबत संसदेत फक्त आपणच आवाज उठवला. दुधाचा भाव शहरात दोन रुपयाने वाढला व ग्रामीण भागात दोन रुपयाने कमी झाला. याबाबत आज पन्नासाव्या वेळी दुधाचे भाव वाढवण्याबद्दल आपण सरकारला विनंती केली आहे. पाच रुपयांचे अनुदान सर्वांना मिळालेले नाही. यावर उपाय झाला नाही तर पुढच्या आठ ते दहा दिवसात दुध व कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागण्यांसाठी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोहित पवार यांच्यासह आपण उद्या बारामती व पुरंदरचा दुष्काळी दौरा करणार आहोत.१२ तारखेला शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर येणार आहेत. दि.१३ व१४ रोजी ते बारामतीचा दुष्काळी दौरा करणार आहेत. प्रत्यक्ष पावसास सुरुवात होत नाही. शासन उपाययोजना करत नाही तोपर्यंत दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळेल याच्यासाठी काम करु