घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका

By राजू इनामदार | Published: July 4, 2023 06:11 PM2023-07-04T18:11:42+5:302023-07-04T18:17:32+5:30

प्रफुल्ल पाटील किंवा दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत

If the clock pulls the fork, the fork will pull the clock; All developments questionable, Raj Thackeray's criticism | घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका

घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका

googlenewsNext

पुणे: राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते किळसवाणे आहे. घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं काहीच समजत नाही. मात्र हे काही अचानक घडलेले नाही तर फार आधीपासून ठरत होतं अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी आले असताना राज यांनी पत्रकारांबरोबर बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर या सर्व किळसवाण्या गोष्टी आहेत असे सांगितले. राज म्हणाले, अशा गोष्टी अचानक होत नाहीत. हे सगळे फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. प्रफुल्ल पाटील किंवा दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत. शरद पवार यांच्याबरोबरची ही माणसे अचानक उठतील व अजित पवारांना साथ देतील असे होणार नाही. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यताही राज यांनी व्यक्त केली. उद्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही या आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला.

सध्या कोण कुठे आहे ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत सांगता येईल, बाबू वागसकर कुठे आहेत तर ते मनसेत आहेत असे सांगता येते, बाकी कोण कुठे, कोणाबरोबर आहे हे सांगणे अशक्य आहे. कॅरम एकदम कसा तरी फुटला आहे, कोणाची गोटी कोणाच्या भोकात असे सांगता येणार नाही असे राज म्हणाले.  यासंबधी आपण लवकरच आयोजित मनसेच्या मेळाव्यात सविस्तर बोलू असे त्यांनी सांगितले. राज यांच्याबरोबर यावेळी मनसेचे बाबू वागसकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: If the clock pulls the fork, the fork will pull the clock; All developments questionable, Raj Thackeray's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.