मुलीला माझ्यासोबत बोलू दिले नाही तर मुलासह जायवाला मारून टाकणार; २२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: May 26, 2024 04:59 PM2024-05-26T16:59:47+5:302024-05-26T17:00:42+5:30

तुम्ही तीचे लग्न दुसरीकडे कसे करता बघतोच, मी हिचे लग्न होऊ देणार नाही

If the girl is not allowed to speak with me, I will kill the one who goes with the boy; A case has been registered against a 22-year-old youth | मुलीला माझ्यासोबत बोलू दिले नाही तर मुलासह जायवाला मारून टाकणार; २२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल

मुलीला माझ्यासोबत बोलू दिले नाही तर मुलासह जायवाला मारून टाकणार; २२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : ‘तीला’ जर माझ्यासोबत बोलू दिले नाही तर तुमच्या मुलासह जावयाला मारून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या २२ वर्षीय आरोपीविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी याच आरोपीने २२ वर्षीय फिर्यादी मुलीला देखील माझ्याशी लग्न केले नाहीस, माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. यश दादा घुले (२२, रा. मांजरी) असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी २२ वर्षीय मुलीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी यश हा त्यांच्या घरात आला, व त्याने मुलीला माझ्याशी लग्न कर अन्यथा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच मुलीचा हात ओढून माझ्यासोबत चल बोलायचे आहे म्हणत तो तिला घराबाहेर घेऊन जायला लागला. यामुळे मुलीची आई त्याला समजावण्यासाठी आली असता, आरोपी यश याने त्यांना देखील तुम्ही तीचे लग्न दुसरीकडे कसे करता बघतोच, मी हिचे लग्न होऊ देणार नाही, तुम्ही जर हिला माझ्यासोबत बोलू दिले नाही तर तुमच्या मुलाला आणि जावयाला मारून टाकीन अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या मुलीने पोलिसांकडे जात आरोपी यश घुले विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी यशला अटक केली असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गांधले करत आहेत.

Web Title: If the girl is not allowed to speak with me, I will kill the one who goes with the boy; A case has been registered against a 22-year-old youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.