महापालिकेला वेळ लागणार असेल तर पुण्यातील 'या' भागाचे पाणी प्रश्न लोकसहभागातून सोडवू-चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:42 PM2022-07-31T17:42:21+5:302022-07-31T17:42:35+5:30

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज

If the Municipal Corporation needs time we will solve the water problem of this part of Pune through public participation Chandrakant Patil | महापालिकेला वेळ लागणार असेल तर पुण्यातील 'या' भागाचे पाणी प्रश्न लोकसहभागातून सोडवू-चंद्रकांत पाटील

महापालिकेला वेळ लागणार असेल तर पुण्यातील 'या' भागाचे पाणी प्रश्न लोकसहभागातून सोडवू-चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पुणे : पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेला हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ लागणार असेल, तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार.चंद्रकांत पाटील यांनी केले.  त्यासाठी महापालिकेने आवश्यक परवानगी आणि पायाभूत सुविधा निर्माण करुन द्याव्यात असे आवाहन आ.‌पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना केले.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस भागातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाणेर येथे बैठक झाली. या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर, स्थानिक माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी दिवसागणिक प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन ज्या उपाययोजना करत आहेत, त्या पूर्ण होऊन इथल्या नागरिकांना समान पाणीपुरवठा होण्यास नक्कीच वेळ लागणार आहे. कारण, धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला, तरी पाण्याची वाहतूक करणारी व्यवस्था महापालिकेकडे नसल्याने अनंत अडचणी येत आहेत. आजही अनेक ठिकाणी असमान पाणीपुरवठा होत आहे.

लोकसहभागातून आम्ही २५ लाख लिटरच्या सिंथेटिक पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देऊ

पुणेकरांची पाण्याची मागणी ही वाढत आहे. पुणे शहराला किमान एक कोटी टीएमसी पाण्याची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आणि तात्पूरता उपाय म्हणून महापालिका टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी दाखवत आहे. पण टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात काही मर्यादा आहेत. एक कोटी टीएमसी पाणी हे टॅंकरने उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्याच्या साठवणुकीची व्यवस्था उभी करणं गरजेचे आहे. पाण्याच्या साठवणुकीसाठी अधिकाधिक क्षमतेच्या सिमेंटच्या टाक्या उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे ही व्यवस्था तातडीने उभी करणे महापालिकेला शक्य नसेल, तर लोकसहभागातून आम्ही २५ लाख लिटरच्या सिंथेटिक पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देऊ. त्यासाठीच्या आवश्यक परवानगी देऊन पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी सूचना पाटील यांनी यावेळी केली.

Web Title: If the Municipal Corporation needs time we will solve the water problem of this part of Pune through public participation Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.