'पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा लढवेन; हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवण्याचे दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:03 PM2024-01-05T12:03:12+5:302024-01-05T12:15:03+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
Hasan Mushrif ( Marathi News ) : पुणे- देशात काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असून सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात महायुती ही निवडणूक एकत्र लढणार आहे. यासाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. जागांचे समसमान वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. सध्या कोल्हापूर लोकसभेचे खासदार शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत, आज पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना मुश्रीफ यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
आज पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, "महायुतीतील तिनही पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू आहे. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून जर माझ्या पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढण्याची जबाबदारी दिली तर मी निवडणूक लढवेन, असे संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
तर दुसरीकडे, मावळ लोकसबेवरुन महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारेणे यांना अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी विरोध सुरू केला आहे. त्यांनी आधी नऊ वर्षात काय कामे केलीत हे समोर ठेवावे आणि नंतर निवडणुकीला सामोरे जावावे, असं आ्व्हान शेळके यांनी दिले आहे. त्यामुळे आता या जागेवरुन महायुतीत अंतर्गत वाद सुरू असल्याचे दिसत आहे. आता कोल्हापूरच्या जागेवर हसन मुश्रीफ यांनी संकेत दिले आहेत, यामुळे आता महायुतीत जागावाटपावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
INDIA आघाडीत जागावाटपाचा तिढा आणखी वाढला; प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर दबाव
मुश्रीफ यांची अमोल कोल्हेंवर टीका
मुश्रीफ म्हणाले, मागे एकदा अमोल कोल्हे मला म्हणाले होते, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मी राजकारण बंद करणार आहे आणि तेव्हाच ते भेकडासारखे पळून गेले होते, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
आव्हाड यांच्या विधानावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, आमदार रोहित पवार जे बोलले ते बरोबर आहे. त्यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. प्रत्येकाच्या आस्थेची भावना असते. त्यामुळे बोलणे टाळले पाहिजे, असंही मुश्रीफ म्हणाले.
आज पुण्यातील ससून रुग्णालयात जिल्हा नियोजन आणि इतर विभागातील आढावा घेणार आहे. तृतीय पंथी वार्डाचे देखील उद्घाटन होत आहे. ललित पाटील प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.