पथारी दुकान भाडेतत्वावर असल्यास संबंधित मालकाचा परवाना रद्द; अतिक्रमण विभागाची गंभीरपणे कारवाई

By राजू हिंगे | Published: April 6, 2023 01:54 PM2023-04-06T13:54:30+5:302023-04-06T13:54:45+5:30

अतिक्रमण विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करून दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील

If the Pathari shop is on lease cancel the license of the owner concerned Serious action by encroachment department | पथारी दुकान भाडेतत्वावर असल्यास संबंधित मालकाचा परवाना रद्द; अतिक्रमण विभागाची गंभीरपणे कारवाई

पथारी दुकान भाडेतत्वावर असल्यास संबंधित मालकाचा परवाना रद्द; अतिक्रमण विभागाची गंभीरपणे कारवाई

googlenewsNext

पुणे : शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडेतत्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने अशा पथारीधारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अशा पथारी धारकांवर तीव्र कारवाई सुरु करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या पथारी धारकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. याबाबत उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले कि, अशा फेरीवाल्याना अगोदर समाज देण्यात आली आहे. आता विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करतील. त्यावेळी संबंधित दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील. त्यावरून लक्षात येईल कि दुकान भाडेतत्वावर आहे कि नाही. दुकान भाडेतत्वावर असेल तर तात्काळ संबंधित मालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. आता ही कारवाई तीव्र करण्यात येत आहे. असेही माधव जगताप यांनी सांगितले.

Web Title: If the Pathari shop is on lease cancel the license of the owner concerned Serious action by encroachment department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.