नाटक प्रगल्भ असल्यास नियमांचे टेंशन कशाला?- विद्यानिधी वनारसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 09:18 PM2023-09-14T21:18:37+5:302023-09-14T21:18:49+5:30

58व्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण

If the play is profound why the tension of rules?- Vidyanidhi Vanarse | नाटक प्रगल्भ असल्यास नियमांचे टेंशन कशाला?- विद्यानिधी वनारसे

नाटक प्रगल्भ असल्यास नियमांचे टेंशन कशाला?- विद्यानिधी वनारसे

googlenewsNext

पुणे : स्पर्धा म्हटली की यश-अपयश असतेच, ही सापेक्ष गोष्ट आहे. स्पर्धेतून समज, समस्या दूर करणे, संघ उभारणी, वक्तशीरपणा आणि सजगता या गोष्टी शिकायला मिळतात. आपल्याला नाटक काय सादर करायचे आहे याचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे, जेणे करून स्पर्धेच्या चौकटीत आपल्याला काय राहून काय करता येते, हे समजू शकते. नाटक प्रगल्भ झाले तर नियमात राहून ते उत्तम रितीने सादर करता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी आणि एशिया पॅसिफिक ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे (आयटीआय-युनेस्को) उपाध्यक्ष विद्यानिधी (प्रसाद) वनारसे यांनी केले.             

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दि.14) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण वनारसे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, अंतिम फेरीचे परीक्षक चंद्रशेखर कुलकर्णी, सुषमा सावरकर-जोग, दीपक रेगे, प्राथमिक फेरीचे परीक्षक मिलिंद कुलकर्णी, शेखर नाईक व्यासपीठावर होते. पारितोषिक स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‌‘आव्वाज कुणाचा' असा नारा देत एकच जल्लोष केला. वनारसे म्हणाले, नाटक कला ही माणसा-माणसातील बात आहे. ही कला एक माणूस दुसऱ्या माणसासाठी सादर करत असताना तंत्राचा वापर करण्यास हरकत नाही; परंतु नाटकातून जे सांगायचे आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

नाटकाविषयी सतत बोलले गेले पाहिजे, एकमेकांचे नाटक बघितले गेले पाहिजे, तालमी बघितल्या गेल्या पाहिजेत, यातून एकांकिका चांगल्या पद्धतीने सादर होण्यास नक्कीच मदत होते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या गोष्टीला अधिक महत्त्व असल्याने उत्तम नाटक करण्यावर भर देऊन तंत्राच्या आहारी जाऊ नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले, संघ ज्यावेळी स्पर्धेत सहभाग नोंदवितो त्याच वेळी स्पर्धेच्या नियमांची माहिती दिली जाते. नियम एकदाच नाही तर तीन वेळा विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जातात.

त्यामुळे विद्यार्थ्यांना नियम माहित नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही. चुकीचे अर्थ काढत विद्यार्थ्यांनी मनानेच नियम बदल केले असल्यास कलोपासक त्यात काही करू शकत नाही. मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर यांनी केला. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी स्पर्धेत पुरुषोत्तम करंडक पटकाविलेल्या ‌‘पिक्सल्स' या एकांकिकेचे सादरीकरण टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या संघाने केले.

Web Title: If the play is profound why the tension of rules?- Vidyanidhi Vanarse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे