भीमा नदीवरील पूल झाल्यास दौंडला फायदा : कटारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:08+5:302021-05-24T04:10:08+5:30
येथील भीमा नदीवरील पुलाच्या जागेची पाहणी करताना कटारिया बोलत होते. या वेळी आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा शीतल कटारिया, नगरसेवक ...
येथील भीमा नदीवरील पुलाच्या जागेची पाहणी करताना कटारिया बोलत होते. या वेळी आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा शीतल कटारिया, नगरसेवक शहानवाज पठाण, योगेश कटारिया, हरिभाऊ ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे हरीश्चंद्र माळशिकारे, सत्यशील नागरारे उपस्थित होते. दौंड व श्रीगोंदा तालुक्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील दौंड-गार पूल झाल्यास दळणवळण वाढेल. कारण गार आणि परिसरातील ग्रामस्थांना श्रीगोंदा दूरवर आहे. त्या तुलनेत दौंड जवळ आहे, परिणामी या भागातील ग्रामस्थांना होडीतून नाईलाजास्तव जीवघेणा प्रवास करावा लागतो. दरम्यान भीमा नदीवरील हा पूल झाल्यास याचा फायदा आर्थिक दृष्टिकोनातून दौंडला होणार आहे. मात्र या पुलाच्या मंजुरीसाठी आमदार राहुल कुल यांचे योगदान असल्याचे शेवटी प्रेमसुख कटारिया म्हणाले. याप्रसंगी आमदार राहुल कुल म्हणाले की दौंड-गार पुलाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे १९ कोटी ९९ लक्ष रुपये केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री. नितीन गडकरी यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. सर्व शासकीय कामकाजाची पूर्तता करुन या पुलाच्या कामास सुरुवात होईल. भीमा नदीवरील पुलासाठी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा केला होता.
होडीचा प्रवास धोक्याचा
गार (ता. श्रीगोंदा) परिसरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी दौंडला होडीतून नदीपात्र ओलांडून प्रवास शालेय विद्यार्थ्यांसाठी धोक्याचा आहे. त्यातच नदीला पूर आल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात असते.
शीतल कटारिया
(नगराध्यक्षा)
दौंड येथील भीमा नदीवर दौंड-गार पुलासाठी जागेची पाहणी करून चर्चा करताना आमदार राहुल कुल, प्रेमसुख कटारिया आणि मान्यवर.