नियोजन नाही झालं तर पुण्यासारखी शहर उध्वस्त होतील; राज ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:19 PM2024-05-10T21:19:47+5:302024-05-10T21:20:41+5:30
पुणे शहराचे नियोजन उत्तम होऊ नये. म्हणून हे राजकीय नेते तुम्हाला जातीपातीत गुंतवून ठेवतायेत
पुणे : पुणे शहराहची वाट लागायला वेळ लागणार नाही. या शहराची लोकसंख्या ७० लाख आहे. ३० लाख लोकसंख्या होती, यात वाहने ७२ लाख तुम्हाला रस्ते कुठून मिळणार? असा सवाल उपस्थित करत नियोजन नाही झालं तर पुण्यासारखी शहर उध्वस्त होतील. असा इशारा राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत दिला आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, आपल्या नियोजन शून्य गोष्टींमुळे शहरे उध्वस्त होत आहेत. पुण्यात शिक्षण आणि नोकऱ्या उपलब्ध आहेत. तरी आपल्याकडची मुले परदेशी का जातायेत? त्यांच्या सभोवतालचे अंतर आनंदी नाही म्हणून ते देश सोडून चालले आहेत. घाणेरड्या वातावरणात ते राहू शकत नाही. म्हणून ते बाहेर जात आहेत त्यानं हे घाणेरडे वातावरण बाहेर ढकलत आहे. मी कित्येक वर्ष या पुणे शहरात येऊन सांगायचो, कि मुंबई शहर बरबाद व्हायला एक काळ गेला, पण पुणे शहराची वाट लागायला वेळ लागणार नाही.
आता मेट्रो सुरु झालीये, मी सांगितलं होत कि, एक सुरु करून बघा पुणेकर जातायेत का? पुणेकरांची काय परिस्थिती की टू व्हीलर घेतली आणि गेला पुढे. शहराच्या लोकसंखेप्रमाणे १५ टक्के रस्ते लागतात, तेवढे पुण्यात नाहीत. लोक शिक्षणासाठी, उद्योगासाठी आले आहेत. पुण्यात विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, कंपन्या, उद्योगधंदे आहेत. पण नियोजन शून्य मुळे ते उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.
शहराच्या विकासात पुणे महापालिकेला माहीत नाही. केंद्राकडून पैसे येतात काय चाललंय. जनतेला काही माहित नाही. शहराचे नियोजन आज नाही झाले तर फुटतील शहर उद्धवस्त होतील. या शहराचे नियोजन उत्तम होऊ नये. म्हणून हे राजकीय नेते तुम्हाला जातीपातीत गुंतवून ठेवत आहेत. एखादा माणूस जातीचा आधार घेतो नि निवडणूक लढवतो. एक काळ पुणे काय सुंदर होत. आता नियोजनशून्य शहर होत चाललंय.