रेशनकार्डला ‘आधार’ लिंक नसल्यास १ फेब्रुवारीपासून रेशन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:21+5:302021-01-09T04:09:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व कार्डधारकांना आपला आधार क्रमांक लिंक ...

If there is no 'Aadhaar' link on the ration card, the ration will be closed from February 1 | रेशनकार्डला ‘आधार’ लिंक नसल्यास १ फेब्रुवारीपासून रेशन बंद

रेशनकार्डला ‘आधार’ लिंक नसल्यास १ फेब्रुवारीपासून रेशन बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व कार्डधारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केले आहे. यामुळेच रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास येत्या १ फेब्रुवारीपासून रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक शंभर टक्के लिंक करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे एकूण १३ लाख ३२ हजार ८७१ एवढे लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत १0 लाख ६१ हजार ८२२ (७९.६६) टक्के इतक्या लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग पूर्ण झाले आहे. अद्याप ही सुमारे तीन लाखपेक्षा अधिक लाभार्थीचे आधार लिंकिंग पूर्ण झालेले नाही.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल लिंकीग सुधारणे आवश्यक आहे. याकरीता रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ईकेवायसी व मोबाईल लिंकीग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. याकरिता 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार लिंकीग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक लिंक करण्याच्या उद्दीष्टाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 11 परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्दारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाचे लिंकीग करण्यात येणार आहे. याबाबत आधार लिंकीग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करणेत आलेली असुन 31 जानेवारी 2021 पूर्वी या लाभाध्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक लिंकीग करण्याचे निर्देश 11 परिमंडळ कार्यालयांना देणेत आलेले आहेत.

Web Title: If there is no 'Aadhaar' link on the ration card, the ration will be closed from February 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.