भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास ईडीच्या पाठोपाठ येतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:06+5:302021-01-08T04:34:06+5:30
लोकमत न्युज नेटवर्क इंदापूर : ईडीच्या नोटीस या केवळ राजकीय हेतूनेच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याबरोबर येतात. विशेष म्हणजे, ...
लोकमत न्युज नेटवर्क
इंदापूर : ईडीच्या नोटीस या केवळ राजकीय हेतूनेच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याबरोबर येतात. विशेष म्हणजे, या नोटिसा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अथवा नेत्यांना येत नाही. त्यामुळे या मागे किती मोठे राजकारण आहे, हे सर्वसामान्य लोकांना समजत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर केला.
प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर या पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी इंदापूर येथील नगरसेवक स्वप्निल राऊत यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी युवा नगरसेवक स्वप्निल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी चाकणकर यांचा सन्मान केला, तर महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी आभार मानले.
या वेळी झगडेवाडीच्या सरपंच रुपाली झगडे, सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत आगरकर, दीप्ती राऊत, सुनीता पवार व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सन्मान करताना नगरसेवक स्वप्निल राऊत व महिला पदाधिकारी.