जर ते स्पॉटवर गेले असतील, तर यामध्ये गैर काय? गृहमंत्र्यांकडून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 06:06 PM2022-01-02T18:06:03+5:302022-01-02T18:33:03+5:30

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश एका कारवाईमुळे चर्चेत आले आहेत

If they ve been to the spot whats wrong with that Home Minister Dilip Walse Patil follows Police Commissioner Krishnaprakash | जर ते स्पॉटवर गेले असतील, तर यामध्ये गैर काय? गृहमंत्र्यांकडून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पाठराखण

जर ते स्पॉटवर गेले असतील, तर यामध्ये गैर काय? गृहमंत्र्यांकडून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पाठराखण

googlenewsNext

पुणे : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश एका कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी त्यांनी चक्क आरोपींवर झाड फेकलं. त्यानंतर आरोपी खाली पडले आणि मग त्यांना ताब्यात घेण्यात आलं असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. परंतु पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या कारवाईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. पुण्यात साखरसंकुल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, चाकण येथे जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल मी स्वतः माहिती घेतली असून ही घटना खरोखरच घडली आहे. पोलीस आणि आरोपींमध्ये त्या ठिकाणी संघर्ष झाला असून पोलीस आयुक्त इतर अधिकार्‍यांसमवेत स्पॉटवर गेले होते. ते जर स्पॉटवर गेले असतील तर यामध्ये गैर काय? यामध्ये काहीही चुकीचं आहे असं मला वाटत नाही असे सांगून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पाठराखण केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी खरोखरच झाड फेकून मारलं की नाही याबाबत माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृष्णप्रकाश यांनी पळून जाणाऱ्या आरोपींच्या दिशेने झाड फेकले

पिंपरी-चिंचवड परिसरात गोळीबार करून फरार झालेले काही आरोपी चाकण परिसरात लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी गेले होते. स्वतः पोलिस आयुक्त या पथकाचे नेतृत्व करत होते. परंतु पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. यावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पळून जाणाऱ्या आरोपींच्या दिशेने झाड फेकले आणि त्यानंतर आरोपी खाली पडले. त्यानंतर इतर पोलिसांनी आरोपींना पकडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. 

परंतु पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश स्वतः या कारवाईमध्ये का सहभागी झाले होते ? त्यांनी आरोपींच्या दिशेनं खरंच झाड फेकून मारलं का ? की हा केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट होता असे प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित करण्यात आले होते? त्यानंतर आता स्वतःलाच गृहमंत्र्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

Web Title: If they ve been to the spot whats wrong with that Home Minister Dilip Walse Patil follows Police Commissioner Krishnaprakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.