हे सरकार चालणार नाही तर पळणार..." पुण्यातील रिक्षाचालकांच्या मुख्यमंत्र्यांकडून वाढल्या अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 07:09 PM2022-07-01T19:09:31+5:302022-07-01T19:09:44+5:30

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री झालेल्या शिंदेकडून रिक्षाचालकांच्या मागण्या

If this government does not work it will run away Expected expectations from the Chief Minister eknath shinde of rickshaw pullers in Pune | हे सरकार चालणार नाही तर पळणार..." पुण्यातील रिक्षाचालकांच्या मुख्यमंत्र्यांकडून वाढल्या अपेक्षा

हे सरकार चालणार नाही तर पळणार..." पुण्यातील रिक्षाचालकांच्या मुख्यमंत्र्यांकडून वाढल्या अपेक्षा

Next

पुणे : एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी राजभवनात 30 वे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, सगळी कडे चर्चा होत आहे ती एक त्यांच्या साधा रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाच्या प्रवासाची. याआधीच्या महाविकास आघाडीवर टीका केली जायची की हे तीन चाकी सरकार आहे कसे चालणार ? पण आज एक रिक्षा चालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. तर हे सरकार चालणार नाही तर पळणार अशी भावना पुण्यातील रिक्षा चालक व्यक्त करीत आहेत. तसेच मुळ रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी निर्णय घ्यावेत अशी मागणी त्यांच्याकडून हाेत आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः रिक्षा चालवली आहे तर त्यांना रिक्षाचालकांच्या अडचणी माहिती आहेत आणि आमच्या असणाऱ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत. याबाबत दैनिक लाेकमत ने काही रिक्षाचालकांशी संवाद साधला व त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांनी या अपेक्षा व्यक्त केल्या.

आम्हाला स्वतःच घर मिळावे

एक रिक्षाचालक मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला आजही स्वतःचे घर नाही. 8 ते 10 लोक आम्ही भाड्याचे घरात राहतो. तर आमची त्यांना विनंती आहे की आम्हाला स्वतःच घर मिळावे. अशी एखादी योजना शासनाकडून आणावी त्याचे हप्ते आम्ही फेडू पण आम्हाला घर मिळावं. - राजेश कोंढे, सेवक वसाहत, पुणे विद्यापीठ

रिक्षाचालकास पेन्शन योजना चालू करावी

आम्ही तरुण आहोत तो पर्यंत आम्ही रिक्षा चालवणार आणि आमचा उदार निर्वाह भागवणार. पण उतार वयात काय? तर शासनाने उतार वयात रिक्षाचालकास पेन्शन योजना चालू करावी. - दिलीप तरपे, सांगवी

मुलांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात

आम्ही रिक्षा चालवतो म्हणजे आम्ही समाज सेवा करत असतो तरी शिक्षण महाग झाले आहे. म्हणून मुलाचा शिक्षण खर्च आम्हाला खूप जड जातो. त्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात. - नागेश पाटील, दिघी

अनाधिकृत रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवले पाहिजे 

ओलामुळे आम्हाला रोजगार मिळतो पण आम्हाला पिक अप आणि वेटिंग चे पैसे मिळत नाहीत. सीएनजी आणि पेट्रोल चे भाव जास्त वाढल्यामुळे लोक थोड्या अंतरासाठी पायी जाणे पसंद करतात. कारण त्यांना रिक्षाचे भाडे परवडत नाही त्यामुळे इंधनाचे भाव कमी झाले पाहिजे. तसेच आज अनधिकृत रिक्षाचालक खूप झाले आहेत त्यांच्यावर पण नियंत्रण ठेवले पाहिजे. - विनोद वैरागर, औंध गाव

पत्नी मुलांना शासनात सवलत मिळावी

रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावेत , रिक्षाचालकासाठी मोफत आरोग्य योजना चालू कराव्यात, रिक्षा चालवताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा कुटुंबास पाच लाख रुपये मिळावेत व त्याच्या पत्नी मुलांना शासनात सवलत मिळावी. - गणेश बाबुराव ठोंबरे, पौड गाव

Web Title: If this government does not work it will run away Expected expectations from the Chief Minister eknath shinde of rickshaw pullers in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.