"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 05:57 PM2024-06-06T17:57:52+5:302024-06-06T18:00:23+5:30
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी बारामती आणि दौंडकरांचे आभारही मानले.
राज्यात दुष्काळाची पसिस्थिती आहे. त्याच बरोबर, कांद्याला अजिबात भाव नाही. दुधाला भाव नाही. मी मागच्या आठवड्यात रिझल्ट येण्यापूर्वीही बोलले होते की, जर या सरकारने आपल्याला लवकरात लवकर दुधाला भाव वाढवून दिला नाही, तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे आणि मी स्वतः उपोषणाला बसणा, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला आहे. त्या दौंडमध्ये बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी बारामती आणि दौंडकरांचे आभारही मानले.
मी बारामती मतदारसंघ आणि दौंड करांचे आभार मानते -
सुळे म्हणाल्या, "मला पत्रकारांनी पुण्यात अनेक प्रश्न विचारले, मी म्हणाले माझा रेकॉर्ड बघा. मी आठ महिन्यांपासून सांगतेय कांद्याच्या भावासंदर्भात बोला, सरकारने काही केले नही. सहा महिने झाले दुष्काळ आणि दुधाच्या भावासंदर्भात बोलले, या सरकारने काही केले नाही. घरं फोड, पक्ष फोड, भीती दाखव स्टेटस लावला, तर त्याला रागव आणि भ्रष्टार, यात हे सरकार एवढे व्यस्त होते की, सर्वसामान्य माय-बाप जनतेसाठी या सरकारकडे वेळच नव्हता. मी बारामती मतदारसंघ आणि दौंड करांचे नतमस्तक होऊन आभार मानते, की एवढ्या विश्वासाने आपन मला संधी दिली."
"लोक विचारतात कसं वाटतं? म्हटलं, मलाना रिझट लागल्यानंतर आणखीनच टेन्शन आलंय. कारण दीड लाख मतांनी निवडून आली आहे. याचा अर्थ आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. आपल्याकडून लोकांना अपेक्षा आहेत. तुमचं प्रेम साहेबांवर की, १० सीट महाराष्ट्रात लढलो, ८ आल्या आणि नववी, ती दुसरी पिपाणी नसती तर साताऱ्याचीही सीट आपलीच होती. ते तिथे कॉपी करून पास झाले आहेत नवव्या सीटवर. दुर्दैव आहे, रडीचा डाव खेळले," असा टोमणाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी विरोधकांना लागावला.