''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू''

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 04:23 PM2019-09-24T16:23:39+5:302019-09-24T17:00:53+5:30

पुण्यात मंगळवारी मराठी क्रांती ठोक मोर्च्याची पत्रकार परिषदेत पार पडली.

If Udayan Raje fail in the elections, we will protest against government : Maratha Kranti Thok Morcha | ''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू''

''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू''

Next

पुणे : सरकार उदयनराजे भोसले यांची फसवणूक करीत आहे. महाराष्ट्रतील मराठा समाज सरकारवर नाराज आहे म्हणून त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला. मात्र त्यांना पाडण्याचे षड्यंत्र सरकारकडून रचले जात आहे, असे झाले तर सरकारचा दहावा घालू असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. 

पुण्यात मंगळवारी मराठी क्रांती ठोक मोर्च्याची पत्रकार परिषदेत पार पडली. त्यावेळी सांगण्यात आले की, नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उदयनराजे यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. उदयनराजे मराठा समाजाचे राजे आहेत. त्यांना अशी वागणूक दिलेली मराठा समाज सहन करणार नाही. उदयनराजेना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्यांची आहे. जर त्यांचा पराभव झाला तर राज्यात हाहाःकार माजेल..

याच परिषदेत मराठा आरक्षणवरही भाष्य करण्यात आले. सांगण्यात आले की, मराठा आरक्षणाला विरोध करण्याऱ्या नेत्यांच्या विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रचार करणार आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या  पंकजा मुंडे, छगन भुजबळ, महादेव जानकर यांना मराठा समाज जागा दाखवेल असेही स्पष्ट करण्यात आले. 

Web Title: If Udayan Raje fail in the elections, we will protest against government : Maratha Kranti Thok Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.