घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही : अॅड प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 07:35 PM2019-04-21T19:35:32+5:302019-04-21T19:38:20+5:30
घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाही, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले.
पुणे : घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाहीला, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले. पुणे लाेकसभेचे वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ एसएसपीएमएसच्या मैदानावर आंबेडकरांची सभा झाली त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून पवारांवर नाव न घेता जाेरदार टीका केली.
आंबेडकर म्हणाले, एका नेत्याने माढातून माघार घेतली तर नातवाला मावळमधून उमेदवारी दिली. त्या नातवाचे गुण सांगितले तर आजाेबांना धक्का बसेल त्यांना काही झाले तर दाेष माझ्यावर यायचा. इंदू मिल येथील स्मारकाच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात माेदी मला म्हंटले तुम्ही मला भेटत नाहीत. तेव्हा मी म्हंटलं कामाशिवाय मी काेणाला भेटत नाही. परंतु मला माेदींना सांगायचंय की मी त्यांना आता 23 मे नंतरच भेटणार आहे. गुजरातमधील राखीव संसाधन म्हणून ठेवण्यात आलेला मीठाचा डाेंगर माेदींनी एका व्यवसायिकाला विकल्याचा आराेपही आंबेडकरांनी यावेळी माेदींवर केला. माेदी देशातील संपत्ती कवडीमाेलाने विकत असल्याचेही ते म्हणाले.
आपल्या भाषणात आंबेडकरांनी काॅंग्रेसवर देखील टीकेची झाेड उठवली. काॅंग्रेसच्या खादीमध्ये खाकी शिरत असल्याचे ते म्हणाले. काॅंग्रेसला पुण्यात उमेदवार सापडत नव्हता, परंतु त्यांनी आमच्याशी बाेलणी केली नाही. यंदाच्या निवडणुकीत काॅंग्रेस तिसऱ्या स्थानावर असल्याने आमची लढत थेट भाजपाशी आहे. मिलिंद एकबाेटे आणि संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आपण सत्तेत आलं पाहिजे असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.