उसाच्या वजनात काटा मारल्यास कारखाने बंद पाडू : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:39+5:302021-09-13T04:09:39+5:30
पाटेठाण येथे रयत शेतकरी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा रयत ...
पाटेठाण येथे रयत शेतकरी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा रयत शेतकरी संघटनेच्या सहसचिवपदी अंकुशराव विष्णू हंबीर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना देशमुख यांनी सांगितले की, ज्या कारखान्यांनी शासनाच्या एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाची बिले दिले नाहीत अशा कारखान्यांना गाळप करण्याची परवानगी देऊ नये, त्याबाबतचे निवेदन साखर आयुक्त यांना देणार आहोत.
या वेळी पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रामदास कोतवाल,उपाध्यक्ष सुशील शिंदे,अनिल कोतवाल,सुभाष तिकोळे,आबासाहेब देवकर,राजू बोराटे,अमोल शिंदे,हेमंत चौधरी,सावंत महाराज,पाटील यादव,बाळासाहेब हंबीर,गणेश भालेराव,महादेव हंबीर,अनिल पाबळे,वसंतराव हंबीर,सुरेश मेमाने,बाळासाहेब वडघुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
120921\fb_img_1631438993622.jpg
सोबत फोटो.
पाटेठाण येथे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बापूसाहेब देशमुख.