"आगामी निवडणुकांमध्ये राजकीय नुकसान टाळायचं असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करण्याची आवश्यकता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 04:54 PM2021-07-16T16:54:32+5:302021-07-16T16:59:57+5:30

आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करण्याची आवश्यकता पुणे महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येणार

"If we want to avoid political loss in the upcoming elections, then ShivSena needs to form an alliance with BJP again ..." : Ramdas Athawale | "आगामी निवडणुकांमध्ये राजकीय नुकसान टाळायचं असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करण्याची आवश्यकता..."

"आगामी निवडणुकांमध्ये राजकीय नुकसान टाळायचं असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करण्याची आवश्यकता..."

Next

पुणे : पुणे महापालिकेची पंचवार्षिक निवडणुक आम्ही भाजपसोबतच लढणार आहोत. पुन्हा आमचीच सत्ता येईल असे भाकीत केंद्रीय समाजकल्याणमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वर्तविले आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळे लढले‌ तर आम्ही त्यांच्यावर मात करू असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

रामदास आठवले हे शुक्रवारी (दि. १६) पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.  

आठवले म्हणाले, राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. आगामी पालिका निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढविली जाईल. मात्र, विधानसभा आमच्या चिन्हावर लढविण्याचा प्रयत्न आहे. भाजपाच्या‌ सहकार्याने रिपाइंला उपमहापौरपद मिळाले. 

पुण्याचा विस्तार होत असून, ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. 
-----
'नो कोरोना'... आठवलेंचा नवा नारा
मी गो कोरोनाचा नारा दिला होता. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता, 'नो कोरोना नो कोरोना'चा नारा देत असल्याचे आठवले म्हणाले.
-----
दुसरी महापालिका करा
पालिकेच्या हद्दीत २३ गावे समावेश केल्याने शहराचे क्षेत्र वाढल्याने दुसरी महापालिका करावी. राज्य‌ सरकारने पुण्यासाठी साडेचार एफएसआय द्यावा. जेणेकरून बिल्डर एसआरएसाठी पुढे येतील आणि झोपडपट्टी धारकांना फायदा मिळेल.
------

Web Title: "If we want to avoid political loss in the upcoming elections, then ShivSena needs to form an alliance with BJP again ..." : Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.