बाप्पांची पीओपी मूर्ती करणाऱ्यांवर आलं विघ्न; गणेशोत्सवाच्या ४ महिन्यापूर्वीच मूर्ती उत्पादनावर पूर्णपणे बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 01:46 PM2022-05-12T13:46:21+5:302022-05-12T13:50:14+5:30
पुणे : गणेशोत्सवाच्या चार महिन्यापूर्वीच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी पीओपी मूर्तींच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. यामुळे येत्या ...
पुणे: गणेशोत्सवाच्या चार महिन्यापूर्वीच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी पीओपी मूर्तींच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. यामुळे येत्या गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांनी, कारागीर व गणेश मंडळांनी पीओपीच्या मूर्ती बनवू नये असे सूचित केले असून, या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
सदर आदेशानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची शहरात काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे. या आदेशानंतरही शहरातील मूर्ती उत्पादक कारागीर यांनी पीओपी मूर्ती बनविल्या तर मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
याबाबतची अधिक माहिती ही www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.