ऑनलाइन जोडीदार शोधताय? सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 03:52 PM2022-01-31T15:52:50+5:302022-01-31T15:53:17+5:30

इंटरनेटवरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरच्या अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत

If you are looking for a mate online for marriage be careful pune crime news | ऑनलाइन जोडीदार शोधताय? सावधान!

ऑनलाइन जोडीदार शोधताय? सावधान!

Next

पुणे: आजच्या काळात मॅट्रिमॉनिअल (ऑनलाइन) किंवा फेसबुकवर फ्रेन्ड्स रिक्वेस्ट टाकून लग्नासाठी जोडीदार शोधताना अनेक मुले-मुली आढळतात. परंतु, हे करताना खबरदारी घ्यावी लागते. अन्यथा, फसवले जाण्याची शक्यता असते. अन्यथा, पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. आज अनेक फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी अशी माहिती सायबर क्राइम अभ्यासक प्रा. योगेश हांडके यांनी दिली.

इंटरनेटवरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरच्या अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. काही वेळा तर लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही, हे लक्षात येऊन घटस्फोट होतात. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या ऑनलाईन भेटीतून किंवा मॅट्रिमॉनिअल वेबसाइटवर कसे समजणार नाही का ? वैवाहिक वेबसाइटवरून चॅटिंग करून स्वत:बद्दलची चुकीची माहिती देऊन त्याला/तिला प्रेमपाशात अडकविण्याचे प्रकार घडत आहे तेव्हा सावध राहिले पाहिजे. धक्कादायक बाब म्हणजे अशा साइटच्या माध्यमातून काही मुले /मुली स्वत:ची खरी माहिती लपवून दुसरा विवाह करतात.

इंटरनेटचे तोटे आणि धोके लक्षात घेतले पाहिजे. इंटरनेट हे फायद्यासाठी आणि सुरक्षितपणे कसे वापरायचे, हे आत्मसात करणे आवश्यक आहे.

खालील गोष्टी लक्षात ठेवा :

- लग्न करायचा विचार पक्का झाला असेल तरच आपली माहिती लग्नविषयक साइटवर नोंदवा.

- विवाहसंकेतस्थळावर असलेल्या माहितीवर पूर्णत: विश्वास ठेवू नका मुला /मुलीच्या शिक्षणाबद्दल, नोकरी विषयी ठिकाणाविषयी प्रत्यक्ष त्याच्या/तिच्या ऑफिसात जाऊन तेथील लोकांना भेटून चौकशी करून घ्या.

- एकदा तरी त्याचे/तिचे संपूर्ण तपशील गुगलवर चेक करा शक्य झाले तर त्याच्या/तिच्या फेसबुक अकाउंटवर हेरगिरी करा.

- स्मार्ट फोनवर त्याचा/तिचा फोन नंबर ट्रु कॉलर ॲपवर तपासा म्हणजे त्याचे/तिचे नाव बरोबर आहे का, इतके तरी किमान तपासून घेता येईल.

- विवाहपूर्वी २-३ वेळा मुला-मुलींनी एकमेकांची भेट घ्यावी.

- विवाह इच्छुक जर परदेशातील असेल तर हेरगिरी केलेले केव्हाही चांगले, त्यासाठी शक्य असल्यास खासगी गुप्तहेरांची मदत घ्या.

- मुलीच्या पालकांनी शक्य असल्यास आपली मुलगी ज्या घरामध्ये सून म्हणून वावरणार आहे, त्या घराची पार्श्वभूमी, नवरा मुलगा, त्याच्या सवयी, व्यसने, त्याची नोकरी/व्यवसाय, मित्र कंपनी या गोष्टींची खात्रीलायक चौकशी करण्यासाठी सुद्धा खासगी गुप्तहेरांचा वापर करावा.

Web Title: If you are looking for a mate online for marriage be careful pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.