तू जर इथून गेला नाहीस तर तूला ठोकून काढीन, नगरसेविकेच्या मुलाची पोलिसाला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 07:16 PM2017-10-09T19:16:00+5:302017-10-09T19:18:37+5:30
पत्नीला मारहाण करत असताना विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला ‘ तू जर इथून गेला नाहीस तर तूला ठोकून काढीन, अशी धमकी देत सांगलीमधील काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाने पोलिसावर पिस्तुल रोखले.
पुणे : पत्नीला मारहाण करत असताना विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला ‘ तू जर इथून गेला नाहीस तर तूला ठोकून काढीन, अशी धमकी देत सांगलीमधील काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाने पोलिसावर पिस्तुल रोखले.
याप्रकरणी त्याला मार्के़टयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. सॉलिटेअर अपार्टमेंट मार्केटयार्ड येथे रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.
मयुरेश बाबासाहेब पाटील (वय 36. रा, सॉलिटेअर अपार्टमेंट मार्केटयार्ड ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस शिपाई तोडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. मयुरेश हा सांगलीतील काँग्रेस नगरसेविका पुष्पलता पाटील यांचा मुलगा असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्शल ड्युटीवर असताना रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पाटील यांच्या पत्नीचा पोलीस ठाण्यामध्ये फोन आला की
त्यांचे पती आरोपी मयुरेश ते त्यांना मारहाण करून गळा दाबत आहेत. मला पोलीस मदतीची आवश्यकता आहे असे म्हटल्यामुळे आॅनड्यूटीवरील पोलीस शिपाई तोडकर आणि पोना पोटकुले हे घटनास्थळी गेले. तक्रारदाराकडे विचारपूस केली
असता आमच्या नवरा-बायकोमधली भांडणे आहेत असे त्यांनी सांगितले. आरोपीला विचारले असता त्याने स्वत:कडील पिस्तुल तोडकर यांच्यावर रोखून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वायकर करीत आहेत.