स्वातंत्र्याचे मोल न कळाल्यास स्वैराचार होईल : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:53 AM2018-09-10T01:53:01+5:302018-09-10T01:53:05+5:30

देशाला कुठल्या परिस्थितीत आणि किती संघर्षाने स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे.

If you do not know the value of independence, then you will get rid of it: Girish Bapat | स्वातंत्र्याचे मोल न कळाल्यास स्वैराचार होईल : गिरीश बापट

स्वातंत्र्याचे मोल न कळाल्यास स्वैराचार होईल : गिरीश बापट

Next

पुणे : देशाला कुठल्या परिस्थितीत आणि किती संघर्षाने स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यामागे अनेकांच्या बलिदान आहे. हे विसरता कामा नये. ब्रिटीशांनी जाताना देखील तोडा फोडीचे राजकारण केले. विष पसरवले. यासगळ्याचा अभ्यास करुन स्वातंत्र्याचा आदर राखण्याची
गरज आहे. मिळालेल्य स्वातंत्र्याची किंमत न उरल्यास समाजात स्वैराचार पसरण्यास वेळ लागणार नाही, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन-लातुर ‘रौप्यमहोत्सव’ वर्षानिमित्त हैद्राबाद मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सेनानीच्या शौर्यगाथा नवीन
पिढीला माहिती व्हाव्यात या
हेतूने समितीने उपक्रमाचे
आयोजन केले होते. गोखले सभागृह येथे माजी आमदार उल्हास पवार, डॉ.प्राचार्य सोमनाथ रोडे, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, अ‍ॅड. मनोहर धुमारे, डी. टी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
बापट म्हणाले, खरा इतिहास हा पुस्तकातून नव्हे तर संवादातून समजावून घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्य त्यामागील भावना,
इतिहास हे समजून घेवून समाजात वागावे लागेल्
यावेळी ‘अनासक्त कर्मयोगी : पूज्य बाबासाहेब परांजपे’ या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: If you do not know the value of independence, then you will get rid of it: Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.