HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 02:42 PM2023-05-25T14:42:30+5:302023-05-25T14:42:40+5:30
यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के लागला आहे. कोकण विभाग अग्रेसर असून सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई ८८.१३ टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के एवढा आहे.मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त आहे.
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी दोन वाजल्यानंतर ऑनलाईन माध्यमातून जाहीर होणार आहे. ऑनलाईन निकाल पाहत असताना विद्यार्थी आणि पालकांना काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी राज्य मंडळाकडून मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक दिले असून त्यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे :
०२०-२५७०५२०९,०२०-२५७०५२०३, ०२०-२५७०५२०४, ०२०-२५७०५२०६, ०२०-२५७०५२०७, ०२०-२५७०५१५१ निकाल पाहताना काही अडचण आली तर विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.