तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाचीही कोंडी फोडू - प्रवीण माने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 05:45 PM2024-11-07T17:45:57+5:302024-11-07T17:46:21+5:30
आम्ही याअगोदरही तरुणांना रोजगार मिळवून दिला, आणखीही तरुणांना रोजगार मिळवून देऊ
बावडा (इंदापूर) : आपल्याला येथे उसाचा प्रश्न आहे. आपल्या येथे ऊस वेळेवर जात नाही. गेला तर वेळेवर पैसे मिळत नाहीत. इतर कारखान्याबरोबर भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या गोष्टीचा फटका बसतो. तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाची ही कोंडी फोडू.वेळेवर ऊस घेऊन जाऊ वेळेवर पैसे देऊ तो व्यवहार सोनाई ग्रूप चा आहे. फक्त एकदा विश्वास ठेवून बघा असा सुरवड (ता. इंदापूर) दि. ७ नोव्हें .रोजी भैरवनाथ मंदिर येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी उपस्थित मतदार बंधू-भगिनींना आपल्या मनोगतातून विश्वास दिला.
प्रवीण माने पुढे म्हणाले की,२३ नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण इंदापूर विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरला आणि २६ तारखेपासून घोंगडी बैठकीला तालुक्यामध्ये सुरुवात केली. या घोंगडी बैठकीचे रूपांतर जाहीर सभेत होऊ लागले. यामध्ये जनतेचा पाठिंबा मिळाला. जेव्हा जनता पाठिंबा देते तेव्हा कोणाचेही काही चालत नाही. सुरवड गावाने सगळ्या नेत्यांना संधी दिली. तुम्ही मला एक वेळा संधी द्या .या संधीचं सेवक म्हणून मी काम करेन. अशी विनंती त्यांनी यावेळी केली. तसेच तुमची आपुलकी प्रेम हे मला विसरता येत नाही. मला झोपतानाही टेन्शन येत आहे. कारण लोकांचा कल पाहून जबाबदारी वाढली आहे. आपण जे बोलू ते पाच वर्षांमध्ये करून दाखवतो.
२००२ च्या वेळी दुधाच्या ही बाबतीत अशी अडचण होती. दुधाला न्याय मिळाला का नाही? दहा - पंधरा दिवसाला दुधाचे पैसे मिळतात. तरुणांना रोजगार मिळाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांनी व्यवसाय सुरू केला. किराणा दुकान, आडत दुकान, शेती पूरक व्यवसाय सुरू केला आणि तरुणांना, माता-भगिनींना रोजगार मिळवून दिला. शेतकऱ्याला न्याय दिला. आणि दुधाचा प्रश्न सोडवला. उसाचा प्रश्न येणाऱ्या काळात सोडवू. या अगोदरही तरुणांना रोजगार दिला आहे आणखीही तरुणांना रोजगार मिळवून देऊ.
भिगवण, लोणी, जक्शन येथील एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणू.आता आपल्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये मयूरसिंह पाटील,उमेश घोगरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट यांनी पाठींबा दिला. तुमच्या आशीर्वादाने परिवर्तन अटळ आहे. असा विश्वास प्रवीण माने यांनी यावेळी व्यक्त केला.