बलात्काराची तक्रार देण्यास गेली तर मारून टाकण्याची धमकी, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:53 AM2024-06-22T10:53:06+5:302024-06-22T10:53:44+5:30

पुणे : कोणत्याही पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार देण्यास गेलीस तर तुला मारून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या एकावर कोरेगाव पार्क ...

If you go to report the molestation you will be threatened with death, an incident in Koregaon Park area | बलात्काराची तक्रार देण्यास गेली तर मारून टाकण्याची धमकी, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

बलात्काराची तक्रार देण्यास गेली तर मारून टाकण्याची धमकी, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

पुणे : कोणत्याही पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार देण्यास गेलीस तर तुला मारून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या एकावर कोरेगाव पार्कपोलिस ठाण्यात बलात्कार तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष ऊर्फ पप्पू पाटोळे (२४, रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाटोळे याने तरुणीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कोरेगाव पार्क तसेच अहमदनगर येथे बलात्कार केला. नंतर तिला लग्नास नकार दिला. हा प्रकार मे ते २० जून २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इंगोले या करत आहेत.

Web Title: If you go to report the molestation you will be threatened with death, an incident in Koregaon Park area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.