पिस्तूल घेऊन खेळायला आवडते तर मग उत्तम करिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:28+5:302021-04-16T04:09:28+5:30

-- बहुतांशा बालमित्रांना चोर-पोलिसांचा खेळ खेळायला खूप आवडतंण आपल्यातील प्रत्येक जणांनी एकदा तरी हा खेळ खेळताना चोर किंवा पोलीस ...

If you like to play with a pistol, then a great career | पिस्तूल घेऊन खेळायला आवडते तर मग उत्तम करिअर

पिस्तूल घेऊन खेळायला आवडते तर मग उत्तम करिअर

Next

--

बहुतांशा बालमित्रांना चोर-पोलिसांचा खेळ खेळायला खूप आवडतंण आपल्यातील प्रत्येक जणांनी एकदा तरी हा खेळ खेळताना चोर किंवा पोलीस बनून हातात नकली पिस्तूल घेऊन ढिशक्याव... ढिशक्याव... केलेच असेल. त्या पिस्तूलाचं आकर्षण हे स्वाभाविकपणे बालागोपळांना असतेच. मात्र हेच आकर्षण पुढे तुमचा छंद बनला आणि त्या छंदालाच तुमचं करिअर बनवता येऊ शकेल. हो हे अगदी खरं आहे त्यासाठी तुम्हाला हवं एअर पिस्तूल या खेळाचे तंत्रशुद्ध आणि व्यावसायिक प्रशिक्षण. सध्या यामध्ये भारताचे खेळाडू अतिशय चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे तुम्हाला ही पिस्तूल आवडत असेल तर त्यात करिअर होऊ शकतं.

१० मीटर एअर पिस्तूल ही आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्टस फेडरेशनद्वारा संचालित ऑलिंपिक इव्हेंट आहे. हे १० मीटर एअर रायफलसारखेच आहे. १० मीटरच्या अंतरावर कॅलिबर एअर गनसह ४.५ मिमी (किंवा १७७) पॅलेटसह शूट केले जाते. स्पर्धेमध्ये महिला व पुरुष दोन्ही गटांना ६० रेकॉर्ड शॉट्स ७५ मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची वेळेची मर्यादा असते. १५ मिनिटे सायटर्ससाठी (रेकॉर्ड शॉट्स सुरू करण्याआधी) अमर्याद प्रमाणात शॉट्स शूट करण्यासाठी परवानगी दिली जाते.

पिस्तूलाचे परिणाम, वजन आणि ट्रिगर पूल वेट संबंधित काही निर्बंध आहेत. पिस्तूल एका स्थायी पोझिशनमध्ये स्वसोयीनुसार विशिष्ट स्टान्स (उभे राहण्याची पद्धत) घेऊन केवळ एका हाताने ऑपरेट केले जाणे आवश्यक आहे. प्रत्येक नेमबाजांना एक टेबल, एक मीटर रुंद फायरिंग पॉईंट आणि फायरिंग लाईन व दहा मीटर अंतराचे लक्ष्य दिले जाते. टार्गेट (१७ बाय १७) व पारंपरिक हलक्या रंगाच्या पुठ्ठ्याचे बनलेले असते, ज्यावर स्कोरिंग वर्तुळ (१३ रिंग ते १०३ रिंग) ब्लॅक वर्तुळ (६३ रिंग ते १२३ रिंग) व्हाईट वर्तुळ असे १० गुणांचे असते. गेल्या काही दशकांदरम्यान हे कागद लक्ष्य इलेक्ट्रॉनिक टार्गेट प्रणालीमध्ये बदलेले गेले आहेत. जे परिणाम मॉनिटर्सवर त्वरित व अचूक प्रदर्शित करतात.

भारताचे शूटिंग या खेळातील प्रदर्शन अतिशय वेगाने उंचावत आहे. मनू बाकर ही एक भारतीय ऑलिपियन आहे, जी १० मी. एअरगन व २५ मीटर स्पोर्टस् पिस्तूल या प्रकारात खेळते. तिने २०१८ च्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले व दोन सुवर्णपदके जिंकली, विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वांत तरुण भारतीय आहे. एलाव्हमिल वॅलारीवन (तमिळनाडू) ही खेळाडू भारताची युवा संवेदना सध्या जगात पहिल्या क्रमांकाची खेळाडू आहे. तिने २०१९ रिओ दि जिनेरो व पुटिआन या दोन्ही विश्वचषकात सलग सुवर्णपदके पटकावून सातत्यपूर्ण कामगिरीचे अनुसरण केले आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी भारताकडे विक्रमी कोटा आहे. २०२१ साठी भारतातून १५ खेळाडूंनी ऑलिंपिक कोटा मिळविला आहे.

--

फोटो : एअर पिस्टल मनू बाकर

फोटो : विद्या जाधव, लेखिका

Web Title: If you like to play with a pistol, then a great career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.