चुकीचे मेसेज पसरविल्यास गुन्हा दाखल करणार : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:27+5:302021-05-13T04:12:27+5:30
जुन्नर : समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पाठवून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात ...
जुन्नर : समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पाठवून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल. व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह व जातीय सलोखा द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट टाकल्याचे आढळले तर पोस्ट करणाऱ्यासह ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ताकीद पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
जुन्नर येथे शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
रमजान ईद या पवित्र सणास कोणतेही सामूहिक पठण होणार नाही तर घरातच नमाज अदा करावेत. अक्षय तृतीयेला होणारी जुन्नरची शिवाई देवीची यात्रादेखील रद्द करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी प्रास्तविक केले. पोलीस निरीक्षक विकास जाधव, तहसीलदार हनुमंत कोळेकर, मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप, नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, नगरसेवक भाऊ कुंभार, फिरोज पठाण, जमीर कागदी, मधुकर काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक - १२ जुन्नर अभिनव देशमुख
फोटो ओळ - जुन्नर येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलताना ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख.