लाँग विकेंड आणि दिवाळी वॅकेशनसाठी पुण्यातील या डेस्टिनेशनचा नक्की विचार करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 06:44 PM2017-10-17T18:44:59+5:302017-10-17T19:56:31+5:30
दिवाळीचा मोठा विकेंड मुंबईबाहेर साजरा करायचा असेल तर पुण्यातील या ठिकाणांचा नक्की विचार करा. पुढे वाचा
यावर्षी सुदैवाने मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना दिवाळीची ३ ते ४ दिवस सुट्टी मिळाली आहे. मुलांच्या सुट्ट्या पाहून त्यांनी इतक्यात प्लँनिंग पण सुरु केलंय. यावर्षी मुंबईबाहेर दिवाळी साजरी करायची असेल तर पुण्यातील या ठिकाणांचा नक्की विचार करा.
अंबोली
सह्याद्रीच्या रांगेतील एक हिरवागार हिल स्टेशन म्हणजे अंबोली. पुण्यापासून ३४० किंमीवर एक विलक्षण जागा आहे. ऑक्टोबरनंतर ट्रेकिंग, पर्यटन किंवा साईट-व्युसाठी लोकं येथे येतात. पावसाळ्यानंतर आंबोलीचा हिरवेगारपणा डोळ्यांचे पारणे फेडतो. आपण आपल्या शहरी धावपळीतून ब्रेक ब्रेक घेऊन दिवाळीसाठी एखादी जागा शोधत असाल तर काही काळ इकडच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
कोलाड
महाराष्ट्रातील रिव्हर राफ्टींगचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजेच कोलाड हे कुंडलिका नदीजवळ आहे. हे पुण्यापासून एक उत्कृष्ट आणि साहसी डेस्टिनेशन आहे. इथे राफ्टिंगशिवाय आपण इतर वॉटर अडव्हेंचर करु शकतो. पुणे ते कोलाड अंतर जवळपास १९४ किमी आहे.
कोयना अभयारण्य व धरण
महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य अतिशय उत्तम ठिकाण आहे जेथे तुम्ही कूटुंबासह जाऊ शकता. वन्यजीवप्रेमींसाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. तिथून जवळच पश्चिमी घाट आहेत. या अभयारण्यात अनेक प्रजातींचे प्राणी पहायला मिळतात आहे. पुणे ते कोयना अभयारण्य हे अंतर जवळपास १४७किमी आहे.
लवासा
लवासा हे पुण्यातील शांत आणि रोमँटीक स्थळ आहे. इथल्या हवेशीर रस्त्यांवरून, हिरव्यागार झाडांमधून ड्राईव्ह करण्याचा आनंद निश्चितच वेगळा आहे. इतकंच नव्हे तर तिथे तुमच्या बजेटनुसार खाण्या-पिण्यासाठीचे पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यापासून अवघ्या ६० किमीवर असल्य़ाने तुम्ही हा पर्याय नक्की वापरु शकता.
दिवेगार
दिवेगार हे शांत,सुंदर, स्वच्छ समुद्र किनाऱ्यांचं ठिकाण अप्रतिम मंदिरांसठी ओळखलं जातं. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित दिवेगर पुण्यातील एक उत्तम पर्याय आहे. जवळच श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर मिळून एक विलक्षण ट्रिप प्लॅन करता येऊ शकते. दिवेआगराचे अंतर पुण्यापासून १६० किमी आहे.
फोटो सौजन्य - india.com