पत्त्यात दुरुस्ती अथवा सुधारणा करायची, तर महिनाभर थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:12+5:302021-08-27T04:16:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: जर तुमच्या आरसी स्मार्ट कार्डवर काही सुधारणा करायची आहे, अथवा काही बदल करायचे आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: जर तुमच्या आरसी स्मार्ट कार्डवर काही सुधारणा करायची आहे, अथवा काही बदल करायचे आहे. तसेच, वाहनाच्या मालकी हक्काचे हस्तांतर करायचे आहे, अथवा आपल्या पत्त्यात बदल करायचा असेल, तर तुम्हाला किमान एक महिना थांबावे लागणार. मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जोपर्यंत त्यास मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत तुमचे काम होणार नाही. त्यामुळे पुणेकरांना आता महिनाभर थांबण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
आरटीओच्या कामात पारदर्शकता यावी, तसेच कामे गतीने व्हावी याकरिता परिवहन आयुक्तांनी आरटीओचा कारभार ऑनलाईन करण्याकडे भर दिला. त्याच अनुषंगाने पत्त्यात बदल, वाहनाचे हस्तांतरण आदी कामे करण्यासाठी मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जोपर्यंत मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत पुणे आरटीओ कार्यालय त्यात कोणताही बदल करू शकत नाही. जेव्हा परिवहन आयुक्त कार्यालय मंजुरी देईल तेव्हाच पुणे आरटीओ कार्यालय ते काम करीत आहे. यामुळे अनेकांचे काम खोळंबले आहे.
---------------------
मला यासंदर्भात काही माहिती नाही. याबाबत माहिती घेतली जाईल. मग आपल्याशी बोलतो.
- राजेंद्र मदने, उपपरिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई
----------------------
पूर्वी ह्या कामासाठी केवळ दोन ते तीन मिनिटांचा वेळ लागत. आता त्याच कामासाठी महिना लागतोय. हे खूप त्रासदायक आहे. जर तुमचा लिपिकावर विश्वास नसेल तर प्रशासनाने याची मंजुरीची जबाबदारी सहायक आरटीओ यांच्याकडे द्यावी.
- बापू भावे, खजिनदार, पुणे शहर रिक्षा फेडरेशन, पुणे