लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:29+5:302021-07-31T04:11:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आम्ही ददू भाईंची माणसे आहोत, लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल”, अशी धमकी ...

If you want to run a lodge, you have to pay an installment ... | लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल...

लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आम्ही ददू भाईंची माणसे आहोत, लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल”, अशी धमकी देत शहरातील पुणे-सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी परिसरातील लॉज चालकाकडे खंडणीची मागणी करीत लॉजची तोडफोड केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गोरख कानकाटे टोळीवर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

शुभम ऊर्फ ददू कानकाटे (वय २४, रा. कोरेगाव, ता. हवेली), अमित डोरले (वय २०, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), साईराज कानकाटे (वय १९, रा. कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सोरतापवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांचे सोरतापवाडी येथे हॉटेल व लॉज आहे. २६ जुलैला आरोपी डोरले त्याठिकाणी गेला असता, त्याने तक्रारदाराला फोन देऊन बोलण्यास सांगितले. त्यानंतर फोनवरून ददू कानवटे याने त्यांच्याकडे ५० हजार रुपये हप्ता ५ तारखेपर्यंत द्यावा लागेल, असे सांगितले. तक्रारदार यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे दोन दुचाकीवरून आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी हातामध्ये कोयते फिरवून दहशत निर्माण करत लॉजवर दगडफेक केली. आरोपींनी आरडा-ओरडा केल्यामुळे शेजारील नागरिक पळून गेले. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमुळे लॉजच्या खिडक्या, दरवाजाचे नुकसान झाले. त्यानंतर आरोपींनी २८ जुलैला दुपारी तक्रारदार यांना फोन करून लॉजखाली बोलवून घेतले. त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसविले. ‘‘धंदा करायचा असेल तर दर महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. पैसे न दिल्यास तुझा धंदा बंद करू”, अशी धमकी दिली. तसेच दरमहा दहा हजार रुपये हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. यानंतर तक्रारदार यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुंड गोरख कानकाटे याचा पुतण्या ददू व इतर अशा तिघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: If you want to run a lodge, you have to pay an installment ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.