पाणी हवे, तर पुनर्वसनाचीही जबाबदारी घ्या; बाबा आढाव यांचे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:28 AM2017-09-04T02:28:23+5:302017-09-04T02:28:36+5:30
शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही.
पाईट : शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य धरण व पुनर्वसन शेतकरी परिषदेचे सरचिटणीस डॉ. बाबा आढाव यांनी केले.
भामा आसखेड धरणावरून पोलीसबळाचा वापर करून सध्या
पुणे जलवाहिनीचे व जॅकवेलचे काम सुरू केले आहे. त्याबाबत आयोजित धरणग्रस्तांच्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पासलकर, किशोर ढमाले, लक्ष्मण मोरे, नारायण कडू, माजी सभापती बन्सूशेठ होले, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, माजी सरपंच बळवंत डांगले, अरुण रौंधळ, सत्यवान नवले, देविदास बांदल, किरण चोरघे, किसन नवले, शामराव रौंधळ, दत्ता होले, कांताराम रौंधळ व मोठ्या प्रमाणावर धरणग्रस्त उपस्थित होते.
लक्ष्मण पासलकर म्हणाले, की शासन आपली भूमिका वेळोवेळी बदलत आहे. हे २१ आॅगस्ट व २८ आॅगस्टच्या पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांच्या बैठकीवरून स्पष्ट झाले आहे. दिनांक ७ रोजी होणाºया जनसुनवाईमध्ये दिलेला लेखी शब्द पाळला नाही तर आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यात येणार आहे.
या वेळी रोहिदास गडदे, बळवंत डांगले, देवदास बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यवान नवले यांनी प्रास्ताविक केले. अरुण रौंधळ यांनी आभार मानले.