रांजणगाव एमआयडीसीत आयएफबी इलेक्ट्रॉनिक कंपनीची १२०० कोटींची गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:13 AM2021-06-16T04:13:16+5:302021-06-16T04:13:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आयएफबी ही प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीत तब्बल १२०० कोटी रुपयांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयएफबी ही प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीत तब्बल १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून, कंपनीसाठी आवश्यक असलेली तब्बल ४५ एकर जमीन नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असून, जिल्ह्यातील सुमारे १० ते १५ हजार महिलांना रोजगार मिळणार असल्याचे पुणे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी सांगितले.
रांजणगाव एमआयडीसीत तब्बल ७०० एकरांमध्ये इलेक्ट्रॉनिक हब उभे राहणार आहे. यासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून व इलेक्ट्रॉनिक हबची सुरुवात आयएफबी ही जग प्रसिद्ध कंपनी पुण्यातील रांजणगाव एमआयडीसीत १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. भाजप सरकार असलेल्या गोवा आणि कर्नाटक राज्यात गुंतवणुकीसाठी आग्रह असताना आयएफबी कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहे. या कंपनीसोबत एमआयडीसीत इतरही इलेक्ट्रॉनिक समभाग बनविणाऱ्या लहान मोठ्या कंपन्या येथे येणार आहे.
------
जिल्ह्यातील १०-१५ हजार लोकांना रोजगार मिळणार
रांजणगाव एमआयडीसीत आयएफबी कंपनीच्या गुंतवणुकीमुळे पुणे जिल्ह्यातील स्थानिक तब्बल १०-१५ हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आयएफबी कंपनीसोबत रांजणगाव एमआयडीसीत इतर अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या देखील येणार आहेत. रांजणगाव एमआयडीसीतील इलेक्ट्रॉनिक हबची ही सुरूवात आहे.
- अविनाश हदगल, पुणे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी