धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

By admin | Published: June 30, 2017 03:31 AM2017-06-30T03:31:54+5:302017-06-30T03:31:54+5:30

जिल्ह्यातील माळीण सद्ृष्य धोकादायक २३ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप झालेली नाहीत.

Ignore dangerous villages | धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील माळीण सद्ृष्य धोकादायक २३ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप झालेली नाहीत. माळीणमधील ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा धोका अधोरेखित झाला आहे. राज्य शासनाकडून सुमारे चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमध्येही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनाची कामे लवकरच केली जाणार आहेत,असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
पहिल्याच पावसात पुनर्वसित माळीणमधील रस्ते खचले, डे्रनेज दबले, घरात पाणी टिपकू लागले.तसेच जमिनीला भेगा पडल्या.त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, माळीणामध्ये तात्काळ दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. परंतु, जिल्हा प्रशासनाने माळीण सदृष्य धोकादायक गावांकडे अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल २३ गावे धोकादायक असल्याचे समोर आले. पावसाळ्यापूर्वी या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे करणे आवश्यक होते. मात्र, निधी प्राप्त न झाल्याने अद्याप या कामांना सुरूवातच केली नसल्याचे दिसून येत आहे. जिओलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया (जीएसआय)आणि कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगतर्फे माळीण दूर्घटनेच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे सुचवली होती. त्यानुसार तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. पावसाचे पाणी गावाबाहेर काढण्यासाठी आवश्यक ठिकाणी बांध घालणे. तसेच संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. मात्र, माळीणची घटना घडून ३ वर्ष होत आली तरीही अद्याप गावांमध्ये आवश्यक कामे झालेली नाहीत.

Web Title: Ignore dangerous villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.