तरूणांचे आत्मविकासाकडे दुर्लक्ष
By admin | Published: November 25, 2015 12:39 AM2015-11-25T00:39:45+5:302015-11-25T00:39:45+5:30
सध्या तरूणाई ही बाहय विकासाकडे मोठया प्रमाणात लक्ष देताना दिसत आहे.तसेच बाहेर देखील वाढता गोंगाट पाहता अंर्तमनाचे देखील ऐकू येत नसल्यामुळे तरूणांचे
पुणे : सध्या तरूणाई ही बाहय विकासाकडे मोठया प्रमाणात लक्ष देताना दिसत आहे.तसेच बाहेर देखील वाढता गोंगाट पाहता अंर्तमनाचे देखील ऐकू येत नसल्यामुळे तरूणांचे आत्मविकासाकडे दुर्लक्ष होत चालल्याचे दिसत आहे असे मत लेखक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
महायोगी श्रीअरविंद विचार मंच आयोजित श्रीअरविंद व्याख्यानमाला आयोजित केली होती त्यावेळी ते निवारा सभागृह या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी श्रीकृष्ण दिक्षित, मीरा दीक्षित, डॉ. अंशुमती दुनाखे आदि उपस्थित होते. तसेच याप्रसंगी मीरा दीक्षित लिखित आत्मविश्वास: माताजींच्या सानिध्यातील या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.तर डॉ. अंशुमती दुनाखे यांचे महामानव श्रीअरविंद या विषयावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते.
जोशी म्हणाले, आत्मविकास करण्यासाठी मनामध्ये एका प्रकारची मोठी विलक्षण ताकद असते. ते नेहमी प्रसन्न ठेवावे लागते. यासाठी आत्मगूढ तयार करणे आवश्यक असते. तसेच सध्या एकांत व एकाग्रता ही मुल्ये हरवत चालली आहे यासाठी आजच्या काळात महायोगी श्रीअरविंद यांचे तत्वज्ञान महत्वपूर्ण आहे.
महायोगी श्रीअरविंद हे विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर यापैकीच एक होते. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते तसेच ते अत्यंत हुशार व विचारशीलदेखील होते. देशासाठी झपाटलेल हे व्यक्तीमहत्व होतं.तसेच देशाचा विकास करायचा असेल तर चळवळ ही जनसामान्यापर्यत पोहोचली पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील होते. इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी सशस्त्र क्रांती केली पाहिजे असे त्यांचे विचार होते.अशी माहिती डॉ. अंशुमती दुनाखे यांनी महामानव अरविंद या व्याख्यानमालिकेत दिली.(प्रतिनिधी)