यवत येथील १२४ झोपड्यांना महावितरणकडून बेकायदेशीर वीज जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:32+5:302021-04-04T04:11:32+5:30
यवत : यवत ( ता. दौंड ) येथील कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या जागेत १२४ झोपड्यांना विद्यूत महावितरण ...
यवत : यवत ( ता. दौंड ) येथील कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या जागेत १२४ झोपड्यांना विद्यूत महावितरण कंपनीने बेकायदेशीर पध्दतीने वीज कन्केशन दिले आहे.
सदरचे बेकायदेशीर वीज कनेक्शन तातडीने काढण्यात यावे अन्यथा अन्यथा विद्यूत महावितरण कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा आशयाचे निवेदन दौंड कृषी ऊत्पन्न बाजार समिती प्रशासनाने दापोडी ( ता. दौंड ) येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयास दिले आहे.
कृषी उत्पन्न समितीच्या यवत येथील जागेत मागील काही वर्षात झोपडपट्टी उभी राहीली असून या झोपड्यांना महावितरणने वीज कनेक्शन दिली आहेत.यावरून आता वाद निर्माण झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या असलेल्या जागेत बाजार समितीच्या परवानगी विना अधिकृत वीज कनेक्शन दिलीच कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने महावितरण कंपनीला बेकायदेशीर वीज कनेक्शन काढून टाकण्यासाठी निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात , यवत येथील ऊपबाजारात गट क्र. ८९०/ १ मध्ये कृषी ऊत्पन्न बाजार समितीची स्वमालकीची दहा एकर जागा आहे .सदर जागेत अतिक्रमण करुन बेकायदेशीर राहणाऱ्या १२४ झोपड्यांना महावितरणने बेकायदेशीर वीज कनेक्शन दिले आहेत. याबाबतची यादी महावितरण कंपनी कडून बाजार समीतीने मिळवलेली आहे. वेळीच सदरचे कनेक्शन काढावे अन्यथा बाजार समितीला झालेल्या नुकसानीला विद्युत महावितरण कंपनी जबाबादार राहील असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.