वाघोलीतील फुटपाथची केबल कंपन्याकडून बेकायदेशीर खोदाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:46+5:302021-05-22T04:10:46+5:30

खाजगी कंपन्यांनी केबल टाकण्याचे काम करताना या फुटपाथची पुरती वाट लावली आहे. या केबल टाकणाऱ्या कंपन्याच्या ठेकेदाराकडे संब्ंधित विभागाच्या ...

Illegal excavation of footpath in Wagholi by cable company | वाघोलीतील फुटपाथची केबल कंपन्याकडून बेकायदेशीर खोदाई

वाघोलीतील फुटपाथची केबल कंपन्याकडून बेकायदेशीर खोदाई

Next

खाजगी कंपन्यांनी केबल टाकण्याचे काम करताना या फुटपाथची पुरती वाट लावली आहे. या केबल टाकणाऱ्या कंपन्याच्या ठेकेदाराकडे संब्ंधित विभागाच्या परवानग्या नसतात. असल्या तरी जुन्याच असतात. तर काही ठिकाणी नियमानुसार रस्ताच्या मध्यापासून पंधरा मीटरच्या बाहेर परवानगी असताना करोडो रुपये खर्च करून केलेल्या कामाचे खोदकाम ह्या कंपन्याचे ठेकेदार करताना दिसून येत आहेत.

पुणे नगर महार्गावरील वाघोलीत पीएमआरडीए च्या माध्यमातून सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. यामध्ये वाघेश्वर मंदिर चौक ते केसनंद फाटा (भावडी रोड) दरम्यान रस्ता रुंदीकरण, चौक रुंद करणे, पावसाळी गटार लाइन, फुटपाथ तयार करून पेव्हिंग ब्लॉक्स बसवणे, रस्ता दुभाजक सुशोभीकरण तसेच रस्ताच्या दुतर्फा झाडे लावणे या कामाचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता.

याबाबत पीएमआरडीएच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर माहिती घेतली असता, ते काम आमच्याकडे येत नाही, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोला आणि त्यांना फोन केला तर ते आमच्याकडे येत नाही पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, अशी टोलवाटोलवीची उत्तरे मिळतात.

--------

कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता बिनधास्त पणे कोणीही या आणि रोडची खोदाई करा, असे प्रकार चालू असून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर संबंधित विभागाने गुन्हे दाखल करावे.

शिवदास पवार, सामाजिक कार्यकर्ते

--------

हे काम बेकायदा होते ते आम्ही बंद करून

फुटपाथचे खोदकाम करून नुकसान करणाऱ्या केबल कंपनीच्या त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई करून घ्यावी, असे न झाल्यास या विरोधात आंदोलन उभारले जाईल.

सर्जेराव वाघमारे, पंचायत समिती सदस्य, हवेली

--------

पीएमआरडीच्या कामाचे नुकसान केले असेल तर गुन्हे दाखल करणार. पीएमआरडीए म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत नाही.आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था यांचे काम केले आहे आणि त्या कामांची देखभाल करणे हे त्यांचे काम आहे

सुहास दिवशे, पीएमआरडीए आयुक्त.

--------

रस्त्याचे व रोडलगत जे काम चालू आहे त्यांचे केबल टाकणाऱ्या ठेकेदाराकडून नुकसान केले जात आहे त्यांच्याविरुद्ध आम्ही वेळोवेळी पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केली आहे पण पोलिसांकडून त्यांच्यावरती कोणत्याही कारवाई आजपर्यंत झाली नाही.

बलस्टवार,सार्वजनिक बांधकाम विभाग, पूर्व विभाग अधिकारी

आणि कुलकर्णी साहेब,साईट अधिकारी,

--------

Web Title: Illegal excavation of footpath in Wagholi by cable company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.