वरवंडमध्ये बेकायदेशी मत्सशेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:12 AM2021-04-07T04:12:23+5:302021-04-07T04:12:23+5:30
भारत देशा मध्ये मांगूर माशाची शेती करण्यास बंदी असताना याची सर्रास शेतील केली जात आहे तरी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष ...
भारत देशा मध्ये मांगूर माशाची शेती करण्यास बंदी असताना याची सर्रास शेतील केली जात आहे तरी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मांगुर माशाच्या वाढीसाठी कुजलेले मास, नासलेली अंडी खाद्य पदार्थ म्हणून पाण्यात टाकले जातात, त्यामुळे पाणी दुषित होते शिवाय अरगुलोसिस सारखे रोग माशांना होतात. मांगूर मास्याच्या खाण्याने कॅन्सरोजन्य आजार होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
तरीही वरवंडमधील व्हिक्टोरिया तलाव शेजारी मांगूरची शेततळी करण्यात आली आहे. केवळ एक दोन नव्हे तर तब्बल दहा ते अकरा शेततळ्यातून शेती केली जाते. हा व्यवसाय गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे. या तळ्यातून पुणे, मुंबई, नाशिक आदी मोठ्या शहरात मासे पाठवले जातात.
--
व्हिक्टोरिया तलावातील जैवविविधता धोक्यात
--
व्हिक्टोरीय तलावाशेजारीच मांगूर माशांची शेततळी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या तळ्यातील अनेक मासे व्हिक्टोरीया तलावातही टाकण्यात आली आहेत. हा मासा नरभक्षक असल्याने या तळ्यातील इतर जातीची मासे कमी झाले असून जैवविविधताही धोक्यात आली असल्याच नागरिकांनी
शेजारी असणाऱ्या व्हिक्टोरिया तलावात जास्त झालेले मासे टाकून दिली असल्यामुळे तलावातील मासे कमी झाले असल्याची श्यक्यता नाकारता येत नाही.
चौकट- असे मोठ्या प्रमाणात बंदी असणाऱ्या माशाची पैदाईस करून नियमाची पायमल्ली करण्यात आली आहे.
--
०६वरवंड मांगुर मासे
फोटो ओळ- शेततळे व मासे