कृषी शिक्षण विभागातील निवृत्त संचालकाकडे दीड कोटींची बेकायदा माया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 07:03 PM2018-09-28T19:03:53+5:302018-09-28T19:04:23+5:30

जुलै १९८० ते जुन २०१४ या कालावधीत १ कोटी ५५ लाख १५ हजार ४२६ रुपयांची बेकायदेशीर माया कमावली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Illegal income of one and a half crores to the retired director of Agriculture Education Department | कृषी शिक्षण विभागातील निवृत्त संचालकाकडे दीड कोटींची बेकायदा माया

कृषी शिक्षण विभागातील निवृत्त संचालकाकडे दीड कोटींची बेकायदा माया

Next
ठळक मुद्दे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत विस्तार शिक्षण व साधन सामग्री विभागाचे संचालक म्हणून निवृत्त

पुणे : पत्नी आणि मुलाच्या मदतीने १९८० पासून दीड कोटींची बेकायदेशीर माया कमावणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद विभागातील विस्तार शिक्षण व साधन सामग्री संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुरेश नामदेव अंबुलगेकर (वय ६०) असे या संचालकाचे नाव आहे. ते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत विस्तार शिक्षण व साधन सामग्री विभागाचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या बरोबर पत्नी मंगाराणी सुरेश अंबुलगेकर (वय ५६) आणि मुलगा नितीन सुरेश अंबुलगेकर (वय ३०, सर्व रा. मु. पो. मुखेड ता. मुखेड जि. नांदेड) यांच्यावर देखील या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अंबुलगेकर यांच्या विरोधात काही तक्रार आली होत्या. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी या प्रकरणाची चौकशी केली असून फिर्याद दिली. त्यानंतर अंबुलगेकर यांच्याकडे केलेल्या उघड चौकशी दरम्यान त्यांनी जुलै १९८० ते जुन २०१४ या कालावधीत १ कोटी ५५ लाख १५ हजार ४२६ रुपयांची बेकायदेशीर माया कमावली असल्याचे निष्पन्न झाले आहे. अंबुलगेकर यांची नांदेड, औरंगाबाद, लातूर आणि पुणे येथे मालमत्ता असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यात अनेक फ्लॅट आणि भुखंड असल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहेत. शासकीय सेवा काळात मिळालेला पगार व इतर भत्ते यांचे एकूण उत्पन्न आणि त्यांच्याकडे असलेली मालमत्ता याचे अंबुलगेकर यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. त्यांची २०१४ पासून चौकशी सुरू होती. या काळात त्यांनी ही सगळी संपत्ती कशाच्या माध्यमातून कमवली याची कागदपत्रे पोलिसांनी मागितली होती. मात्र या संपत्तीबाबत ते कोणतेही योग्य कागदपत्रे देऊ शकले नाही. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि पुण्यात असलेल्या मालमत्तेवर छापे टाकले. या कामात त्यांना पत्नी व मुलगा यांनी जाणीवपुर्वक संगनमत करून अपप्रेरणा दिली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिघांवरही विभागाने गुन्हा दाखल केला. 

Web Title: Illegal income of one and a half crores to the retired director of Agriculture Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.