अवैध सावकारी धंदे जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:22 AM2018-03-14T01:22:06+5:302018-03-14T01:22:06+5:30

अवैध सावकारीच्या धंद्याचा कायमचा बीमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून,२०१४ मध्ये नवीन कायदा मंजूर केला, मात्र धनदांडगे, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत असून, अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत.

Illegal moneylenders | अवैध सावकारी धंदे जोरात

अवैध सावकारी धंदे जोरात

googlenewsNext

आंबेठाण : अवैध सावकारीच्या धंद्याचा कायमचा बीमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून,२०१४ मध्ये नवीन कायदा मंजूर केला, मात्र धनदांडगे, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत असून, अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत. अशा लोकांच्या पोलिसांबरोबर असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, त्यामुळे अवैध सावकारी छुप्या पद्धतीने चाकण परिसरात जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.
नुकतेच एक प्रकरण खेड तालुक्यातील चाकण या शहरात उघडकीस आले आहे, विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक विद्यमान नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खासगी सावकरीचे छुपे धंदे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. चाकण पंचक्रोशीत वाढत्या औद्योगिकीकरणाने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे, जमिनीतून करोडो रुपये आल्याने अनेकांनी छुप्या पद्धतीने अवैध सावकारी सुरू करून, परिसरातील परप्रांतीयांसह राज्याच्या इतर जिल्ह्यांतील अनेक लोकांना काही ठराविक रकमा देऊन, व्याजाचा धंदा सुरू केला आहे. अवैध सावकारीचा धंदा करणाºयांनी गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत अनेक खासगी सावकार ३ ते १० टक्के व्याजाने पैसे देत असल्याचा छुपा धंदा मोठ्या प्रमाणावर होत आहे, काही जण तर चक्क २० ते ४० टक्के व्याजानेही पैसे देत आहेत, हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहेत. परंतु, पर्याय नसल्यामुळे अनेक जण या अवैध सावकारीचा धंदा करणाºयांकडून पैसे घेत आहेत. अवैध सावकारांकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजाचे आकडे दिवसेंदिवस फुगत जातात, मग हे पैसे सावकाराला परत करणे कठीण होते, चाकण परिसरातून अनेक जण खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने कुटुंबासह फरार झाले, तर अनेक जण कुटुंबाला वाºयावर सोडून परागंदा झाले असल्याच्या घटना ताज्या आहेत.
अवैध सावकारीचा धंदा करणाºया काहींनी व्याजापोटी अगोदरच कोºया चेकवर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेत असतात, जर व्याजाची रक्कम थकल्यास सावकाराकडून शिवीगाळ तर केली जातेच. शिवाय, संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. पंरतु अनेक जण भीतीपोटी पोलिसात तक्रार देण्याचे धाडस दाखवत नाहीत. शिवाय अवैध सावकारी करणारे घरी जाऊन जमिनी व घरे नावावर करून देण्याची धमकी देत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये या भागात अवैध सावकारीचे पैसे परत करता येऊ शकत नसल्याने अनेक जण कायमचे फरार झाले आहेत, अनेकांनी व्यवसायासाठी व्याजाने लाखो रुपये घेतले असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.यामधील बहुतेक जणांनी मुद्दल व व्याज देऊनही खासगी अवैध सावकरांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी घर खाली करायला लावणे, दुचाकी, चारचाकी वाहने ताब्यात घेणे, जमीन लिहून घेणे अशा घटना घडत आहेत किंवा अशा धमक्या दिल्याने कर्जदार नातेवाईक व मित्रमंडळींकडून पैसे गोळा करून, सावकाराला परत द्यावे लागत आहेत. एकंदरीतच सावकार झोकात आणि कर्जदार कोमात अशी काहीशी स्थिती चाकण परिसरात आहे.
> चाकण परिसरात सहा जण अवैध पद्धतीने सावकारीचा धंदा करत असल्याचे समोर आले आहे. त्या लोकांवर सावकारीचे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी छुप्या पद्धतीने व्याजाने पैसे घेतले असतील आणि मुद्दल देऊनही, संबंधित सावकार पैसे उकळण्यासाठी दमबाजी किंवा दादागिरी करत असतील, तर त्या लोकांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल करावी, आमच्याकडून तक्रारदाराला संरक्षण दिले जाईल. अवैध पद्धतीने सावकारी करणाºयांचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत. - मनोजकुमार यादव,
पोलीस निरीक्षक,
चाकण पोलीस ठाणे.

Web Title: Illegal moneylenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.