बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केली शिताफीने अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:06 IST2025-01-11T13:06:32+5:302025-01-11T13:06:50+5:30
नायलॉन मांजाचे १८ हजार किंमतीचे ३० रिळ मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेत त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला

बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केली शिताफीने अटक
धनकवडी : धोकादायक नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजाचे १८ हजार किंमतीचे ३० रिळ मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेत त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल शाम कांबळे (वय १९ वर्षे रा. सुखसागर नगर, बनकर शाळेच्या पाठीमागे, तुळजाभवानी मंदिराशेजारी, ) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाणे हद्दित तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हद्दित गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, के. के. मार्केट, सी.एन.जी. पेट्रोलपंपा जवळ एक इसम पतंगा साठी लागणारा व शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे. खात्रीपूर्वक माहिती मिळताच तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत छापा कारवाई केली असता, राहुल कांबळे पतंग उडवण्यासाठी लागणारा व शासणाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजासह ताब्यात घेतले.
सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे अधिकारी सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा पो. फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, महेश भगत, अभिजीत वालगुडे, खंडु शिंदे यांनी केली आहे.