बेकायदा पिस्तूलचे रॅकेट
By admin | Published: September 16, 2014 12:32 AM2014-09-16T00:32:26+5:302014-09-16T00:32:26+5:30
औरंगाबाद आणि अहमदनगर या भागातून अटक करण्यात पुणो पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला यश आले आहे.
Next
पिंपरी : पिस्तूल बेकायदापणो जवळ बाळगणा:यांचे रॅकेट उघडकीस आले असून, पाच आरोपींना पिंपरीजवळील फुगेवाडी, औरंगाबाद आणि अहमदनगर या भागातून अटक करण्यात पुणो पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला यश आले आहे. अटक आरोपींकडून तब्बल 13 पिस्तूल आणि 62 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
रघुनाथ काशिनाथ ढावरे (वय 33, रा. भिंगार, अहमदनगर), समीर विजय भालेराव (वय 24, रा. सुखसागरनगर, कात्रज), अनिल कचरु साळुंके (वय 25, रा. गंगापूर, औरंगाबाद), सुनील ऊर्फ सोन्या मोहन परदेशी (वय 35, रा. नेवासा, अहमदनगर), संतोष मारुती चव्हाण (वय 26, रा. सणसवाडी, शिरूर) अशी राज्याच्या विविध भागातून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्टला फुगेवाडी येथील अशोक हॉटेलसमोर ढावरे व भालेराव हे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ंिमळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघांना पिस्तुलासह अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, हे पिस्तूल त्या दोघांनी साळुंके याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार साळुंकेला औरंगाबादहून अटक करून एक पिस्तूल व दहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
साळुंकेकडे चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल व काडतुसे परदेशी याच्याकडून आणल्याचे सांगितले. सुनील परदेशी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर नेवासा येथे खून, खुनाचा प्रय} आणि दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)
4परदेशी याच्या कोपरगाव येथील सासुरवाडीतील घरातून देशी बनावटीची चार पिस्तूल व 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. परदेशी याने संतोष चव्हाण यालाही पिस्तूल दिल्याचे सांगितल्याने त्यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. परदेशी मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून त्याची राज्याच्या विविध भागात विक्री करीत होता.