गल्लीबोळातील गुंडांकडे दहशतीसाठी बेकायदा पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:39 AM2018-12-01T00:39:52+5:302018-12-01T00:39:54+5:30

पुणे : एकाच दिवसात तीन ठिकाणी गोळीबार झाल्याने गेल्या आठवड्यात पुणे शहर हादरले होते; पण हा आता अपवाद राहिलेला ...

Illegal pistols for scouring of goose bumps | गल्लीबोळातील गुंडांकडे दहशतीसाठी बेकायदा पिस्तूल

गल्लीबोळातील गुंडांकडे दहशतीसाठी बेकायदा पिस्तूल

Next

पुणे : एकाच दिवसात तीन ठिकाणी गोळीबार झाल्याने गेल्या आठवड्यात पुणे शहर हादरले होते; पण हा आता अपवाद राहिलेला नाही़ गल्लीबोळांत छोट्या-मोठ्या गुंडांकडे बेकायदा पिस्तूल सर्रासपणे वापर होऊ लागला आहे़ मध्य प्रदेशातून येणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा शहरात निर्विघ्नपणे सुरूअसून, त्यातील काहीच पोलिसांच्या हाती लागतात़.


नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत पिस्तुलाचा वापर करून गुन्हा केल्याच्या किमान सहा घटना घडल्या आहेत़ त्यातील तीन घटनांमध्ये दहशत माजविण्यासाठी पिस्तुलाचा वापर केला गेल्याचे उघड झाले आहे़ गेल्या तीन वर्षांत पुणे शहरात बेकायदा पिस्तूल बाळगल्याचे २९८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ३८९ आरोपींकडून ३९५ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत़


सुरुवातीला पुण्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून शस्त्रे येत होती़ बिहारमधून येणाºया रेल्वेतून अगदी सामान्य वाटणाºया मजुरांचा त्यासाठी वापर केला जात होता़ ते आपल्या मुलाबाळांसह कपडेलत्ते घेऊन येत असत़ त्यांच्या सामानात लपवून ही हत्यारे आणली जात असे़ त्यासाठी त्यांना मामुली रक्कम दिली जात़ अगदी तुपाच्या डब्यातून शस्त्रे आणली जात असल्याचे यापूर्वी आढळून आले़ पोलिसांच्या हाती केवळ शस्त्राची वाहतूक करणारेच लागतात़ उत्तर प्रदेश, बिहार येथे जाऊन कारवाई करून म्होरक्यांना ताब्यात घेणे शक्य नसल्याने ही कारवाई केवळ शस्त्र बाळगणाºयांपर्यंतच सीमित राहते़ उत्तर प्रदेश, बिहारमधून शस्त्रे आणणाºयांची मोठ्या प्रमाणावर धरपकड झाल्यानंतर मध्य प्रदेशातून पुण्यात शस्त्रे येण्याचे प्रमाण वाढले आहे़ सध्या महाराष्ट्राच्या सीमाभागाला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून ही शस्त्रे प्रामुख्याने आणली जात आहेत़


शस्त्र बाळगणे ही होतेय फॅशन
उपनगरांमध्ये जागेच्या किमती वाढल्यामुळे त्या विकून, तसेच त्याच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारातून अनेकांना कोट्यवधीचा पैसा मिळू लागला़ त्यामुळे त्यांचे हितशत्रूही तयार झाले; पण कायदेशीरदृष्ट्या त्यांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळणे शक्य नसल्याने अशांचा या बेकायदेशीर शस्त्रांकडे ओढा वाढला़ बिहार, मध्य प्रदेशात काही हजारांत मिळणारी ही शस्त्रे पुण्यात ग्राहक पाहून अगदी २० हजार रुपयांपासून ७० ते एक लाख रुपयांपर्यंत मिळतात़


शस्त्रे बाळगणाºयांमध्ये गुंडांबरोबर राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाºयांचाही हात आहे़ आपल्या भागात दहशत निर्माण करण्यासाठी आणि भाई, दादा म्हणून मिरविण्यासाठी एखादे शस्त्र असेल, तर ते काम अधिक सोपे होते़
निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार अशा भार्इंचा आधार घेऊन झोपडपट्टी भागात आपल्याकडे मतदारांना वळवून घेण्यासाठी उपयोग करीत आहेत.

Web Title: Illegal pistols for scouring of goose bumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.