Revenue Department Pune: दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या दीड कोटींच्या २० यांत्रिकी बोटी नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 07:17 PM2022-03-25T19:17:36+5:302022-03-25T19:17:50+5:30

दौंड तालुक्यात मुळा मुठा आणि भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे

illegal sand 20 mechanical boats worth Rs 1.5 crore destroyed in Daund | Revenue Department Pune: दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या दीड कोटींच्या २० यांत्रिकी बोटी नष्ट

Revenue Department Pune: दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या दीड कोटींच्या २० यांत्रिकी बोटी नष्ट

googlenewsNext

दौंड : दौंड शहरा लगत असलेल्या भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या दीड कोटी रुपये किमतीच्या २० यांत्रिकी बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. अशी माहिती तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. महसूल खाते आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. 

दौंड तालुक्यात मुळा मुठा आणि भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. याचा उपद्रव सर्व सामान्य जनतेला होत असल्याने वाळू माफियांना नागरिक हैराण झाले आहे. दौंड येथील भीमा नदीच्या पात्रात २० यांत्रिकी बोटी उद्ध्वस्त करून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मात्र यात कुठल्याही वाळू माफियांना अटक केलेली नाही. एकंदरीतच बेकायदेशीर वाळू उपसा कायमस्वरूपी बंद व्हावा या मागणीने जोर धरला आहे.

Web Title: illegal sand 20 mechanical boats worth Rs 1.5 crore destroyed in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.