चास येथे अवैध वाळू उपसा, पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:01+5:302021-03-28T04:11:01+5:30

चास गावचे हद्दीत नारोडीकडे जाणारे पुलाचे शेजारी स्मशान भूमीजवळ दि. २७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वैभव बबन कडुसकर ...

Illegal sand extraction at Chas, crime against five | चास येथे अवैध वाळू उपसा, पाच जणांवर गुन्हा

चास येथे अवैध वाळू उपसा, पाच जणांवर गुन्हा

Next

चास गावचे हद्दीत नारोडीकडे जाणारे पुलाचे शेजारी स्मशान भूमीजवळ दि. २७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वैभव बबन कडुसकर (वय ४२, रा. साकोरे), पवन सुधीर थोरात (रा.मंचर), तुषार शांताराम टेके (रा. वडगाव काशींबेग), जयेश माने (रा. चास) व सुमंत चिखले (रा. विठ्ठलवाडी.नांदुर) हे पाच जण घोडनदीच्या पात्रात गौणखनिज वाळूउपसा करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असताना घोडेगाव पोलीस ठाण्याच्या रात्र गस्त पथकाला दिसले त्यांनी लगेच कारवाई करत संबंधित व्यक्तिंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करता असताना तुषार टेके, जयेश माने व सुमंत चिखले हे तिघे फरार झाले तर वैभव कडूसकर व पवन थोरात या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक पोलीस उपनिरीक्षक लहू शिंगाडे, पोलीस हवालदार मनिषा तुरे करत आहे.

Web Title: Illegal sand extraction at Chas, crime against five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.