कासवांची अवैध विक्री करणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:20+5:302021-07-02T04:08:20+5:30
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाकडे येथे एक व्यक्ती कासव विक्रीला आणत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी साध्या पोशाखात ...
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाकडे येथे एक व्यक्ती कासव विक्रीला आणत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी साध्या पोशाखात जाऊन सापळा रचला. श्रीकृष्ण वंजारी हे व्यक्ती दुचाकीवर तिथे आले. त्यानंतर तिथून तो व्यक्ती मैत्री चौक, पिंपरीला गेला. तेव्हा अधिकाऱ्याची टीम त्याच्या मागे गेली. तिथे वंजारी याने अथर्व शशिकांत देशमुख या व्यक्तीशी चर्चा करून व्यवहार ठरविला. तेव्हाच त्या दोघांना वन अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर देशमुख यांच्या घरी एक मृत व दोन कासवे जिवंत सापडली. इंडियन टेन्ट टर्टल व दोन इंडियन रूफ्ड टर्टल अशी त्यांची नावे असून, दुसरे दुर्मीळ जातीचे कासव आहे. ते अनुसूची प्रकार- १ मधील संरक्षित आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या निर्देशानुसार सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वन परीक्षेत्र अधिकारी दीपक पवार, सचिन रघतवान, महेश मेरगेवाड, वैभव बाबर, सुरेश बर्ले, ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केली.