मार्केट यार्डात स्वच्छतागृहांच्या जागी उभारले बेकायदेशीर गाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:27+5:302021-07-07T04:13:27+5:30
पुणे : मार्केट यार्डातील बाजार आवारात व्यापारी, शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी नऊ स्वछतागृहे उभारण्यात आली होती. याचा वापर कांदा, ...
पुणे : मार्केट यार्डातील बाजार आवारात व्यापारी, शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी नऊ स्वछतागृहे उभारण्यात आली होती. याचा वापर कांदा, बटाटा, फळे, तरकारी, केळी बाजार अशा विविध विभागातील लोक करत होते. मात्र, त्यानंतर या स्वच्छतागृहांचे रुपांतर बेकायदेशीरपणे गाळ्यात करण्यात आले आहे. या गाळ्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे समोर आले आहे. वीस वर्षांपासून येथे गाळे सुरू आहेत.
वीस वर्षांपूर्वी विविध विभागांसाठी नऊ स्वछतागृहे उभारण्यात आली. मात्र, या स्वछतागृहांचे गाळ्यांमध्ये रूपांतर करून बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. सध्या या नऊ गाळ्यांपैकी दोन ठिकाणी हॉटेल तर इतर ठिकाणी व्यापार सुरू आहे.
कोट
याबाबत पणन संचालकांशी सल्लामसलत करणार आहे. स्वच्छतागृहांचे गाळ्यांत रुपांतर कसे झाले? संबंधितांकडून आतापर्यंतचा भाड्यापोटी फरक तसेच १२ टक्के व्याज आकारून ते नऊ गाळे नियमित करण्याचे विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल.
- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती