गोव्यातील मद्याची अवैध वाहतुक; ट्रकसह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:29 PM2021-03-09T15:29:04+5:302021-03-09T15:30:00+5:30

४८० बॉक्स असलेली अवैध दारु व ट्रकसह सुमारे पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल 

Illegal trafficking of liquor in Goa; 50 lakh worth goods seized along with truck | गोव्यातील मद्याची अवैध वाहतुक; ट्रकसह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त 

गोव्यातील मद्याची अवैध वाहतुक; ट्रकसह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त 

Next

मोरगाव : गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक निरा (ता. पुरंदर )येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ने ताब्यात घेतला आहे . ४८० बॉक्स असलेली अवैध दारु व  ट्रकसहीत सुमारे पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन विभागाने ताब्यात घेतला आहे .

गोवा राज्यात परवानगी असलेल्या  व्हेस्की व ऱॉयल चॅलेंजर दारु घेऊन ट्रक क्र एम. (एच. १८ ए.ए . ८३५५ ) येत असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ला समजली सापळा लावून निरा गावच्या हद्दीत निरा- लोणंद रस्त्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर महाराज विसावा येथे संबंधित ट्रक थांबविण्याच्या या सूचना देण्यात आल्या. ट्रकची तपासणी केली असता सुरवातीला दोनशे लिटरचे मोकळे बॅलर आढळून आले .  

अधिक तपासणी केली असता ट्रकमध्ये रॉयल ब्लॅक व्हिस्की १८० मिली क्षमतेचे ३० बॉक्स , इम्पेरियल बल्यू व्हिस्कीचे २७५ बॉक्स, ऱॉयल चॅलेंजरचे ५० बॉक्स , ट्युबर्ग  स्ट्रॉंग प्रीमिअम बियरचे ७५ बॉक्स, किंग फिशर स्ट्रॉंग प्रीमियमचे ५०० मिली क्षमतेचे ५० बॉक्स असे एकूण ४८० बॉक्स ताब्यात घेतले आहे . याचबरोबर ट्रकसोबत असणारी ईको गाडी (जीजे.१ केवाय. ९८४८ ) ताब्यात घेतले आहे. वाहनासह एकूण ४९,०९,६०० रुपयांचा मुद्देमाल व राजेश लक्ष्मण लोहार (वय ४२ हिसाळे, जि. धुळे) , सुखविंदरसिंग मलकितसिंग ओजला ( वय २५ कर्तापुर ता. घमेला, जि जालंधर, पंजाब), राजु सुरसिंग सोलंकी (वय ३६, रा. गायत्री आश्रम जांभली ता. शेंदवा जि.बडवाणी मध्यप्रदेश) व शैलेशकुमार रामकृष्ण कौरी (वय २५, रा. अहमदाबाद, गुजरात )यांना ताब्यात घेतले आहे .  

पुणे विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे ,व अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गक्रमणाखाली भरारी पथक क्र २ चे दुय्यम निरीक्षण विकास थोरात , एस .के. कानेकर ,सतीश ईंगळे ,प्रशांत धाईंजे, गणेश नागरगोजे ,संतोष गोंदकर,  एस.बी. मांडेकर, नवनाथ पडवळ , केशव वामने , बी. आर. सावंत महीला जवान मनीषा भोसले यांनी कारवाई केली आहे . आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले आहे .

Web Title: Illegal trafficking of liquor in Goa; 50 lakh worth goods seized along with truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.