बेकायदा हस्तांतरण शुल्क; सहकार खात्याची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:34+5:302020-12-30T04:14:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कायद्याचा चुकीचा अर्थ लावून सोसायटी सदस्याकडून बेकायदेशीरपणे हस्तांतरण शुल्क व अन्य रक्कम वसूल केल्याबद्दल सहकार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कायद्याचा चुकीचा अर्थ लावून सोसायटी सदस्याकडून बेकायदेशीरपणे हस्तांतरण शुल्क व अन्य रक्कम वसूल केल्याबद्दल सहकार उपनिबंधकांनी धनकवडी येथील सत्यसाईनगर सहकारी गृहरचना संस्थेवर संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली. त्याचबरोबर सदस्याकडून बेकायदेशीपणे घेतलेली सर्व रक्कम परत करावी, असा आदेशही दिला. त्याचे पालन केले नाही म्हणून संबधित अर्जदाराने परत तक्रार केल्यानंतर संचालक मंडळाला रोज १०० रूपये याप्रमाणे दंडही ठोठावला.
विजय रा. कोतवाल यांनी यासंदर्भात सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यांनी या सोसायटीतील एक सदनिका थेट विकसकाकडून खरेदी केली. अशी खरेदी झाली तर हस्तांतरण शुल्क घेण्याचा काही प्रश्नच येत नाही असे त्यांचे म्हणणे होते, मात्र सोसायटीने ते अमान्य करून कोतवाल यांच्याकडून हस्तांतरण शुल्क म्हणून २० हजार रूपये घेतले. सभासद शुल्क ५०० रूपये असताना २ हजार ५०० रूपये आकारण्यात आले. कोतवाल यांनी सदनिका खरेदी करण्यापुर्वी रंग व कन्वेंन्स डीड करण्याकरता सोसायटीने आकारलेले ५ हजार रूपये शुल्क त्यांनी द्यावे म्हणूनही सोसायटीने त्यांच्याकडे मागणी केली. कोतवाल यांनी हस्तांतरण श्ुल्क, सभासद शुल्क जमा करून त्याच्या पावत्या घेतल्या.
नंतर त्यांनी या सर्व गोष्टींच्या विरोधात सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. हस्तांतरण शुल्क व सदस्य शुल्क आकारणी बेकायदा आहे असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.