रिक्षांतून बेकायदा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:04 AM2017-08-08T03:04:16+5:302017-08-08T03:04:16+5:30

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निगडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावर बेफामपणे आणि बेदरकारपणे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळणारे हे मुजोर चालक मुख्यत्वेकरून पिंपरी, वायसीएम रुग्णालय दरम्यान रिक्षासेवा देणारे आहेत.

 Illegal transportation by rickshaw | रिक्षांतून बेकायदा वाहतूक

रिक्षांतून बेकायदा वाहतूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निगडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावर बेफामपणे आणि बेदरकारपणे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळणारे हे मुजोर चालक मुख्यत्वेकरून पिंपरी, वायसीएम रुग्णालय दरम्यान रिक्षासेवा देणारे आहेत. तीन आसनी रिक्षांमधून चार प्रवाशांची बेकायदेशीरपणे वाहतूक सुरू आहे.
नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे रिक्षाचालक या मार्गावर सर्रास दिसतात निगडी पीएमपी बसथांब्याच्या प्रवेशद्वारासमोर तसेच दत्त मंदिराजवळील पादचारी मार्गावर रिक्षा उभा करून अनेकदा या मार्गावर जाणाºया पीएमपी बसच्या समोरच रिक्षा उभी करून प्रवासी घेण्याचे धाडस करतात. असेच धाडस आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणारे रिक्षाचालक करीत असतात.
रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा निगडी पीएमपी स्थानकापासूनच सुरू होतो. पिंपरी बस आत-बाहेर जाण्याच्या ठिकाणी गर्दी करतात. वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. प्रवाशींची ने-आण करताना अनेक रिक्षाचालक आपापसात स्पर्धा लावतात. वेगाची ही जीवघेणी स्पर्धा सुरू असते. पीएमपी बस डेपोतून बस बाहेर किंंवा आत जात असताना, चौकात थांबण्याचा सिग्नल असताना रिक्षाचालक बेधडक रिक्षा घुसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा पादचारी व दुचाकीस्वारांना धडकून अपघात घडत आहेत. जास्त प्रवासी घेतल्यास किंंवा बेफामपणे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांना हटकले की ते उद्धटपणे वागतात.
निगडीतील उड्डाणपुलाखाली भर रस्त्यात प्रवासी घेण्यासाठी उभ्या केल्या जातात. तेथेच पोलीस वाहतूक नियोजनासाठी थांबलेले असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
तसेच पिंपरी चौकामध्येही रिक्षाचालक बिनधास्तपणे रस्त्यावर उभे असतात. रिक्षांना धक्का लागल्यानंतर चालक अंगावर धावून येतात. बºयाचवेळा वाहन चालकांकडून भिती दाखवून पैसे उकळण्याचेही प्रकार घडतात. याबाबत तक्रार केली तरी पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनोळखी व्यक्तींकडूनही जादा प्रमाणात पैसे उकळले जातात. रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ज्येष्ठांचे हाल
नगडी पीएमपी बसथांब्यासमोर तसेच दत्त मंदिराजवळ रस्ता अरुंद आहे. याशिवाय येथे बस प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहतात. त्यातच पादचारी लोकांसाठी असलेल्या पादचारी मार्गावर ७० ते ९० रिक्षा थांबून प्रवासी घेतले जातात. यामुळे पादचारी जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडत असतात. यात सर्वाधिक हाल होतात वृद्ध, लहान मुले आणि स्त्रियांचे. या रिक्षाचालकांना कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते जुमानत नाहीत.

Web Title:  Illegal transportation by rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.