वन खात्याच्या क्षेत्रात बेकायदा वृक्षतोड
By admin | Published: June 15, 2014 04:16 AM2014-06-15T04:16:16+5:302014-06-15T04:16:16+5:30
उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील वनराईमध्ये राजरोसपणे झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे
Next
उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील वनराईमध्ये राजरोसपणे झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात दिवसभर गुरे चारण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हे होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. एकीकडे सरकार ‘झाडे लावा, झाडे वाचवा’ ‘निसर्गाचा होणारा ऱ्हास टाळा’ असा संदेश देते, तर दुसरीकडे वन खात्याच्या क्षेत्रात राजरोसपणे झाडांची कत्तल सुरू आहे. या झाडांची होणारी कत्तल थांबवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.